शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

अकोल्यात ‘जॅक’द्वारे घर उचलण्याचा पहिलाच प्रयोग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 12:46 IST

मनपा प्रशासनाची परवानगी न घेतल्याप्रकरणी नगररचना विभागाने प्रा. तायडे यांना नोटीस जारी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये शास्त्री नगरस्थित एक मजली रहिवासी इमारतीची ‘जॅक’द्वारे उंची वाढविण्यात आल्याचा प्रयोग सोमवारी उघडकीस आला आहे. मालमत्ताधारक प्रा. ययाती तायडे यांनी केलेला प्रयोग पाहण्यासाठी अकोलेकर या ठिकाणी कुतूहलाने जात असले तरी शेजाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. दरम्यान, यासंदर्भात मनपा प्रशासनाची परवानगी न घेतल्याप्रकरणी नगररचना विभागाने प्रा. तायडे यांना नोटीस जारी केली आहे.प्रभाग क्रमांक १३ मधील शास्त्री नगरस्थित डॉ. साधना लोटे यांच्या हॉस्पिटलसमोर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सहयोगी अधिष्ठाता पदावर कार्यरत प्रा. ययाती तायडे यांचे एक मजली घर आहे. घरासमोरील रस्त्याची आणि मागील बाजूच्या सर्व्हिस लाइनची उंची वाढल्याने दरवर्षी पावसाळ््यात त्यांना सांडपाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत होता. पावसाचे साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने प्रा. तायडे मोटरद्वारे पाण्याचा उपसा करतात. पावसाळ््यात दरवर्षी ही समस्या निर्माण होत असली तरी त्यावर मनपा प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याचे चित्र होते. या समस्येवर उपाय शोधण्याच्या उद्देशातून शहरातील अभियंता अरविंद कांबळे यांनी इंटरनेटवर शोध घेतला असता त्यांना हरियाणा येथील श्री मार्कंडेश्वर नामक एजन्सी ‘जॅक’च्या माध्यमातून इमारत उचलत (लिफ्ट) असल्याचे आढळून आले. कांबळे यांनी संबंधित एजन्सीसोबत संपर्क साधून सविस्तर माहिती दिली असता एजन्सीच्यावतीने प्रा. ययाती तायडे यांच्या घराची पाहणी करण्यात आली. सदर एजन्सीचा पूर्वानुभव लक्षात घेता प्रा. तायडे यांनी एजन्सीला कंत्राट दिला.३०० जॅकद्वारे उचलले घर

  •  घराचे मोजमाप घेतले असता १,२०० चौरस फूट नोंद
  • घराची उंची वाढविण्यासाठी ३०० जॅक लावण्यात आले
  •  अडीच ते दीड फूट अंतरावर जॅक बसविले
  •  एका जॅकचे वजन पेलण्याची क्षमता ३० ते ३५ टन आहे
  •  

विदर्भात पहिलाच प्रयोग‘जॅक’च्या माध्यमातून घराची उंची वाढविण्याचा हा विदर्भातून शहरात पहिलाच प्रयोग मानला जात आहे. घराची उंची रस्त्यापासून तीन फूट वर करण्यात आली असून, आणखी एक ते दीड फूट उंच करण्याची शक्यता आहे. उत्सुकतेपोटी हा प्रयोग पाहण्यासाठी या ठिकाणी नागरिक माहिती घेत असल्याचे दिसून आले.

रस्त्याची व सर्व्हिस लाइनची उंची वाढल्याने घरात पावसाळ््यात घाण सांडपाणी साचत होते. या समस्येविषयी मनपाकडे दाद मागितली. अखेर जॅकद्वारे घराची उंची वाढविण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात मनपाकडे ७ आॅगस्ट रोजी पत्र देऊन अवगत केले आहे. त्यानंतरच कामाला सुरुवात केली. देशात हा प्रयोग नवीन नाही.-प्रा. ययाती तायडे, मालमत्ताधारक

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका