अकोला: यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत अमरावती विभागातून प्रथम पुरस्कारासाठी अकोला जिल्ह्यातील बाश्रीटाकळी तालुक्यातल्या धाबा ग्रामपंचायतची शासनामार्फत निवड करण्यात आली आहे. रविवार, २0 मार्च रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते धाबा ग्रामपंचायतला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत सन २0१४-१५ या वर्षात केलेल्या कामाचे मूल्यामापन विचारात घेऊन, अकोला जिल्ह्यातील बाश्रीटाकळी तालुक्यातील धाबा गावाची अमरावती विभागातून प्रथम पुरस्कारासाठी शासनाकडून निवड करण्यात आली आहे. ३ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २0 मार्च रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते धाबा ग्रामपंचायतला ह्ययशवंत पंचायत राजह्ण अभियानांतर्गत विभाग स्तरावरील प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला धाबा येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारणार आहेत. असे जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
‘यशवंत पंचायत राज’ अभियानात ‘धाबा’ विभागातून प्रथम
By admin | Updated: March 19, 2016 01:55 IST