अकोला: अकोला-बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने येथील खंडेलवाल भवनात गत तीन दिवसांपासून व्यावसायिक व हौसी गटाकरिता विदर्भस्तरीय छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा १६ नोव्हेंबर रोजी समारोप झाला. प्रदर्शनात भाग घेणार्या भूषण जोशी व अश्विन खडसे यांना प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.समारोपीय कार्यक्रमात व्यावसायिक व हौसी गटातील स्पर्धेत भाग घेणार्या विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. व्यावसायिक गटातून प्रथम पुरस्कार अमरावती येथील भूषण जोशी यांना देण्यात आला तर द्वितीय पारितोषिक अकोला येथील विजय आमटे, तृतीय पुरस्कार धारणी येथील श्रेया गुप्ता यांना देण्यात आला. या श्रेणीत उत्तेजनार्थ पारितोषिक मलकापूर येथील योगेश शर्मा तथा अकोला येथील नीरज भांगे यांना बहाल करण्यात आला. हौसी गटातून प्रथम पारितोषिक अकोला येथील अश्विन खडसे, द्वितीय अकोला येथीलच अजय पदमने यांना तसेच तृतीय नागपूर येथील परीक्षित हरसोले यांना देण्यात आले. उत्तेजनार्थ बक्षीस शेगाव येथील कमलेश तेलगोटे, यवतमाळ येथील सुनील भेले यांना बहाल करण्यात आले.
छायाचित्र प्रदर्शनात खडसे, जोशींना प्रथम पुरस्कार
By admin | Updated: November 17, 2014 01:24 IST