दिग्रस बु: पातूर तालुक्यातील सस्ती येथे गोदाम आणि गोठ्याला आग लागून शेतकर्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवार १२ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सस्ती येथील शेतकरी राजकुमार इंगळे यांच्या गोदाम आणि गोठ्याला ११ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे दिसताच इंगळे यांनी आरडाओरड करून शेजार्यांना उठविले. या आगीमुळे गोठ्यात बांधलेल्या एका बैलाचा डोळा भाजला असून, इंगळे यांनी नव्या घरासाठी तयार करून गोदामात ठेवलेले ७ दरवाजे आणि दोन खिडक्या तसेच दोन ताडपत्री जळून अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. इंगळे यांच्या गोदामाला लागलेल्या आगीची माहिती मिळताच पोलिस पाटील बदर्खे कोतवाल बाळू उपर्वट, सरपंच शामराव सुरोशे, तंटामुक्ती अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, वाडेकर आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. (वार्ताहर)
सस्ती येथे शेतकर्याच्या गोदामाला आग
By admin | Updated: May 12, 2014 22:29 IST