शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

मालठाणा येथे घरांना आग!

By admin | Updated: April 7, 2017 00:44 IST

तेल्हारा : मालठाणा बु. येथे ६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता अचानक घरांना आग लागली. या आगीत चार घरातील साहित्य तसेच १० शेळ््या ठार झाल्या.

दहा शेळ्या ठार : चार घरातील साहित्य खाक

तेल्हारा : तालुक्यातील मालठाणा बु. येथे ६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता अचानक घरांना आग लागली. या आगीत चार घरातील साहित्य तसेच १० शेळ््या भाजल्या गेल्याने ठार झाल्या.अडगावजवळ असलेल्या मालठाणा बु. येथे गुरुवारी सायंकाळी ५ वाजता अचानक आग लागली. ही आग पसरत गेल्याने यामध्ये नागोराव पवार यांचे घर पूर्णपणे जळून खाक झाले. तसेच घरातील दहा बकऱ्या भाजल्या गेल्याने ठार झाल्या. उत्तम गवई यांच्या घरातील सहा क्विंटल हरभरा व घरातील सर्व साहित्य, दादाराव गवई यांच्याही घरातील सर्व साहित्य जळाले. डॉ.पंजाबराव धामोडे, दादाराव गवई, विशाल घ्यारे, संतोष धामोडे आदींनी ग्रामस्थांसह आग विझवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना यश आले नाही. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या दोन बंबांना पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. हिवरखेडचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे, तलाठी यांनीही घटनास्थळाला भेट दिली. ही आग गावातील खताला लागून, त्यानंतर घराला लागली असावी, असा अंदाज आहे.पाणीटंचाईमुळे जास्त नुकसान गावात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई आहे. पंधरा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने आग विझवण्यासाठी वेळेवर पाणी मिळाले नाही. त्यामुळे, नुकसान जास्त झाले. यापूर्वीही गावात आग लागल्याची घटना घडली आहे. गंगुबाई पवार या महिलेला आग लागल्याचे कळताच त्या शेतातून परत आल्या. बकऱ्या जळालेल्या पाहताच त्यांनी हंबरडा फोडला.