शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

सिमेंट मार्ग बांधकामाने केला अग्निशमन कार्यालयाचा खोळंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 13:09 IST

तब्बल सहा महिन्यांपासून खोदून ठेवलेल्या या कामामुळे मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या कामात खोळंबा निर्माण झाला आहे.

अकोला : जिल्हाधिकारी कार्यालय ते पंचायत समिती या मार्गाचे काँक्रिटीकरण सुरू झाले असून, एका बाजूचा काही भाग बांधला गेला आहे; मात्र उर्वरित दुसरी बाजू खोदून ठेवण्यात आली आहे. तब्बल सहा महिन्यांपासून खोदून ठेवलेल्या या खोदकामामुळे मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या कामात खोळंबा निर्माण झाला आहे. पर्यायाने मनपा अग्निशमन दलास त्यांच्या सात गाड्या समोरच्या पोलीस वसाहत आणि नवीन रस्त्यावर ठेवण्याची वेळ आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयापासून तर पंचायत समितीपर्यंतच्या काँक्रिट मार्गाचे बांधकाम सुरू झाले. राणी महल आणि बागेच्या देवीच्या बाजूने हा रोड तातडीने तयार केला गेला. दरम्यान, राणी सती मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच्या नाल्यावर स्लॅब टाकायचा असल्याने आणि मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. तांत्रिक अडचणीमुळे या मार्गाचे बांधकाम रखडले असून, त्याचा त्रास मात्र महापालिकेच्या अग्निशमन दलास होत आहे. जर कुठे आग लागली किंवा अपघाती घटना घडली, तर अग्निशमन दलाच्या गाड्यांना येथून काढणेदेखील जमणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अग्निशमन दल विभागाने दोन गाड्या मार्गावर तर इतर तीन गाड्या समोरच्या देवी पोलीस लाइनच्या पोलीस वसाहतीच्या पटांगणात ठेवल्या आहेत. महापालिका प्रशासनाने तातडीने या मार्गाचे बांधकाम केल्यास अडचण दूर होण्याची शक्यता आहे; मात्र अजूनही या घटनेची नोंद प्रशासनाने घेतलेली नाही. 

आमच्याकडे एकूण सात गाड्या असून, त्यातील दोन गाड्या रस्त्यावर आणि तीन गाड्या पोलीस वसाहतमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. तातडीच्या प्रसंगी धावता यावे म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे.-प्रकाश फुलंबकर, प्रभारी अधीक्षक, अग्निशमन विभाग, मनपा, अकोला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका