अकोला: धम्मचक्र प्र्वतन दिनानिमित्त शुभेच्छा फलक लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी भारिप-बमसंचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर मंगळवारी सायंकाळी अकोल्यात गुन्हा दाखल करण्यात आला.अकोल्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाच्या आवारभिंतीवर हे फलक लावण्यात आले होते. महापालिकेचे उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्यातर्फे सहायक अतिक्रमण निर्मूलन अधिकारी विजय बाबूलाल बडोणे यांनी याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार, सिटी कोतवाली पोलिसांनी अँड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध मालमत्ता प्रतिबंधक विद्रूपीकरण अधिनियम १९९५ कलम नुसार गुन्हा दाखल केला.
भारिप-बमसं नेते प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: October 15, 2014 00:20 IST