शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या घरातील तूर-हरभऱ्याचा साठा शोधणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 10:22 IST

शेकडो शेतकऱ्यांच्या घरात ही दोन्ही प्रकारची धान्ये अद्यापही पडून आहेत.

अकोला : नाफेडद्वारे तूर, हरभऱ्याच्या खरेदीचा वेग पाहता जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या घरात ही दोन्ही प्रकारची धान्ये अद्यापही पडून आहेत. हमीभावाने खरेदीसाठी शासनाने घातलेल्या मर्यादेमुळे हा प्रकार घडला आहे. काहींना नोंदणी करूनही क्रमांक न मिळाल्याने त्यांचे धान्य विक्रीविना पडून आहे. शेतकºयांची ही समस्या पाहता जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरात तूर व हरभऱ्याचा किती साठा आहे, याची अचूक माहिती घेण्यासोबतच त्या साठ्याचे जिओ टॅगिंगसह फोटो काढण्याची मोहीम कृषी विभागाने सुरू केली आहे. दोन दिवसांत ही माहिती गोळा करण्याचा आदेश अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी दिला आहे. २३ मार्चपासून लॉकडाउन असल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्यातच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येही धान्य खरेदी बंद होती. शासनाकडून नाफेडद्वारे होत असलेली तूर, हरभऱ्याची खरेदीही सुरूच झाली नव्हती. या प्रकाराने शेतकरी प्रचंड अडचणीत आला. शेतात पिकलेले धान्य घरातच पडून असल्याने आर्थिक कोंडी झाली. त्यातून मार्ग काढण्यासाठी शासनाने तूर, हरभरा खरेदी सुरू केली; एकरी उत्पन्न मर्यादा यामुळे हजारो शेतकºयांना त्यांच्याकडे असलेली तूर, हरभरा नोंदणीनंतरही नाफेडला विक्री करता आला नाही. धान्याच्या खरेदीबाबत उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाला पालकमंत्री बच्चू कडू यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या तूर, हरभºयाच्या साठ्याची माहिती गोळा केली जात आहे. त्यासाठी अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी २२ मे रोजी आदेश दिला आहेजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : २६ मेपर्यंत अहवाल सादर करा!आॅनलाइन नोंदणी केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या घरात पडून असलेल्या शेतमालाचे छायाचित्र काढून गावपातळीवरील कर्मचाºयांच्या पथकामार्फत माहिती संकलित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी दिला असून, वस्तुस्थितीचा अहवाल २६ मेपर्यंत सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले.आॅनलाइन नोंदणी केल्यानंतर कापूस, तूर व हरभरा जिल्ह्यातील शेतकºयांच्या घरात पडून असलेल्या शेतमालाची माहिती संकलित करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी २१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत दिले होते.यासंदर्भात वस्तुस्थितीचा अहवाल २६ मेपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांना दिला.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी