शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलासाठी लाभार्थींची आर्थिक लूट; अधिकारी, सरपंच, ग्रामसेवकांच्या संगनमताने ठरले लक्षांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 12:59 IST

अकोला: रमाई आवास योजनेचा गावनिहाय लक्षांक ठरवताना पंचायत समित्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक, सरपंचांना हाताशी धरून लाभार्थींची अक्षरश: लूट सुरू केली आहे.

अकोला: रमाई आवास योजनेचा गावनिहाय लक्षांक ठरवताना पंचायत समित्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक, सरपंचांना हाताशी धरून लाभार्थींची अक्षरश: लूट सुरू केली आहे. लाभार्थींकडून पैसे वसूल करून देणाºया सरपंच, सचिवांच्या गावात निकषांपेक्षा अधिक घरकुल देण्याचा प्रकार पंचायत समित्यांमध्ये घडत आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी गावांचे लक्षांक तपासल्यास मोठा घोटाळा उघड होणार आहे.सर्वांनाच घरे, या संकल्पनेनुसार ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थींसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली आहे. योजनेसाठी २०११ मध्ये झालेल्या आर्थिक, सामाजिक, जातीनिहाय सर्वेक्षणातून लाभार्थींची संख्या निश्चित झाली आहे. जिल्ह्यात एकूण ६७ हजार लाभार्थी पात्र आहेत. योजनेसाठी २०११ मध्ये झालेल्या आर्थिक, सामाजिक, जातीनिहाय सर्वेक्षणातून लाभार्थींना पात्र यादीत घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. तसे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. त्याचवेळी लाभार्थींसोबत पैशांची बोलणी करून घरकुल देण्याचे आमिष अनेक गावातील सरपंच, सचिवांनी दिले.रमाई आवास योजनेतील घरकुलाचा लक्षांक सामाजिक न्याय विभागाने ठरवून दिला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून पंचायत समिती स्तरावर एकूण घरकुले देण्यात आली. त्याचे गावनिहाय वाटप संबंधित गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकाºयांनी करून तसे पत्र ग्रामसेवकांना दिले. त्यानुसार प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याचेही ग्रामसेवकांना बजावले. 

रकमेवर ठरली घरकुलांची संख्यापंचायत समितीच्या अधिकाºयांशी संबंध असणाºया सरपंच, सचिवांना घरकुलाचा लक्षांक देताना प्रती घरकुल ५ हजार रुपयेप्रमाणे बोली करण्यात आली. गावात लाभार्थींकडून १० हजार रुपये वसूल करून ‘फिफ्टी-फिफ्टी’चा फार्म्युला त्यासाठी लावण्यात आला. अकोला पंचायत समिती अंतर्गत अनेक गावांमधील घरकुलांचा लक्षांक पाहता त्याची चौकशी केल्यास मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे.

अपंगांची घरकुलेही विकलीघरकुलाचा लाभ देताना एकूण घरकुलांपैकी ५ टक्के अपंग लाभार्थींना द्यावी लागतात; मात्र जिल्ह्यात या प्रमाणात वाटप झालेच नाही. त्या अपंग लाभार्थींची घरकुले इतरांना देत त्यांच्याकडून रक्कम उकळण्याचा प्रकारही घडल्याचे चित्र आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद