शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वित्त आयोग: २५ टक्के निधी शाळांसाठी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 13:52 IST

अर्थसंकल्पात काही शाळांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सीसी कॅमेरे लावण्यात येतील. त्या शाळा मॉडेल करण्याचे ठरले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील १३ शाळा मॉडेल स्कूल म्हणून तयार केल्या जातील. वित्त आयोगाचा २५ टक्के निधी शाळांसाठी खर्च करणे, सोबतच दिल्लीच्या शाळांमध्ये केलेल्या बदलांची पाहणी करण्यासाठी समितीचा दौरा नियोजित करण्याचे शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ठरवण्यात आले. सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी जिल्ह्यातील ८४ केंद्रप्रमुखांची बैठक बुधवारी घेतली. यावेळी शिक्षणाधिकारी वैशाली ठग, उपशिक्षणाधिकारी दिलीप तायडे यावेळी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचे ठरले. शाळांना आवश्यक सुविधांमध्ये नवीन खोली बांधकाम, दुरुस्ती, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, डिजिटल साहित्याचा वापर, रॅम्प सुविधा, शालेय रंगरंगोटी तसेच पटसंख्या वाढविण्यासाठी पालकांशी संपर्क ठेवणे, ही कामे प्राधान्याने केली जाणार आहेत.चौदाव्या वित्त आयोगातील २५ टक्के निधी त्यासाठी खर्च करण्याबाबत सरपंच व ग्रामसेवकांना पत्र देण्यात येईल. नियोजन समितीमधून दुरुस्ती व नवीन खोली बांधकामासाठी १८ कोटी रक्कम असून, ती शाळांवर खर्च केली जाईल, असे अश्वासन देण्यात आले. पुढील अर्थसंकल्पात काही शाळांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सीसी कॅमेरे लावण्यात येतील. त्या शाळा मॉडेल करण्याचे ठरले.पालकमंत्री बच्चू कडू यांच्या निर्देशानुसार त्या शाळा मॉडेल स्कूल म्हणून तयार केल्या जात आहेत. शिकस्त शाळांची समस्या शिबिरात निकाली काढली जाईल. चांगले काम करणाऱ्या शिक्षकांची बदली न करता त्यांचा सत्कार केला जाईल. शाळांचे वीज देयक भरण्यासाठी २० लाखांची तरतूद करण्याचेही ठरले. गेल्या वर्षी बदली प्रक्रियेत खोटी माहिती भरणाºया शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले. दिल्ली येथील सरकारी शाळांमध्ये झालेला बदल पाहण्यासाठी अकोला जिल्हा परिषदेच्या संयुक्त समितीचा शैक्षणिक दौरा नियोजित करण्याचेही ठरले. त्या शाळांप्रमाणेच जिल्हा परिषद अकोलामधील शाळांमध्ये बदल करण्याची तयारी असल्याचे सभेत सांगण्यात आले. सभेस प्रशासन अधिकारी सुनील जनोरकर, अंकुश पटेल, पंचायत विभागाचे संजय उंबरकर, प्रशांत अंभोरे, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद