शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आंतरवासीता डॉक्टरांची कोविड वॉर्डात सेवा सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 10:34 IST

Akola GMC Intern Doctor सोमवारपासून कोविड वॉर्डात रुग्णसेवा देण्यास सुरुवात केली.

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने कोविड भत्ता लवकरच सुरू करू, असे आश्वासन दिल्याने येथील आंतरवासीता डॉक्टरांनी सोमवारपासून कोविड वॉर्डात रुग्णसेवा देण्यास सुरुवात केली. कोविड भत्त्याच्या मागणीसाठी गत चार दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयातील १२० आंतरवासीता डॉक्टरांनी कोविड वॉर्डातील रुग्णसेवा बंद केली होती.राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासीता डॉक्टरांना सुरुवातीपासून कोविड भत्ता लागू करण्यात आला होता; मात्र येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील आंतरवासीता डॉक्टरांना अद्यापही कोविड भत्ता लागू करण्यात आला नाही. विद्यावेतनही नियमित मिळत नसल्याने आंतरवासीता डॉक्टरांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून कोविड वॉर्डात रुग्णसेवा देत असताना रुग्णालय प्रशासनाने आंतरवासीता डॉक्टरांना कोविड भत्ता लागू करावा, यासाठी वारंवार निवेदन देण्यात आले; मात्र त्याची दखल घेण्यात न आल्याने सर्वोपचार रुग्णालयातील १२० आंतरवासीता डॉक्टरांनी कोविड वॉर्डात रुग्णसेवा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे गत चार दिवसांपासून कोरोना वॉर्डातील बहुतांश भार परिचारिकांवर आला होता. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने आंतरवासीता डॉक्टरांना नोटीस बजावत २४ तासात रुजू व्हा, अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाईचा इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्यासोबतच रुग्णालय प्रशासनातर्फे आंतरवासीता डॉक्टरांना १५ दिवसांत कोविड भत्ता लागू करण्याचे आश्वासनही दिले. त्यामुळे सोमवारपासून आंतरवासीता डॉक्टरांनी कोविड वॉर्डात सेवा देण्यास सुरुवात केली; मात्र आश्वासनानुसार, कोविड भत्ता न दिल्यास आंतरवासीता डॉक्टरांकडून कोविड वॉर्डातील रुग्णसेवेला पुन्हा नकार दिला जाऊ शकतो.

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या