शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जीएमसीतील ३६ पैकी चार व्हेंटिलेटर कार्यान्वित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 12:54 IST

अद्यापही काही अडचणी येत असल्याने उर्वरित व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यासाठी अडचणी येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र सरकारकडून प्राप्त ३६ व्हेंटिलेटरपैकी काही व्हेंटिलेटर अखेर कार्यान्वित करण्यात आले आहेत. आधी तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने, तर नंतर व्हॉल्व्ह जुळत नसल्याने एक महिना उशीर झाला होता. अद्यापही काही अडचणी येत असल्याने उर्वरित व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यासाठी अडचणी येत आहेत.राज्यात कोरोनाने थैमान घातले असून, काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या अन् मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. या परिस्थितीवर नियंत्रणासाठी राज्याप्रमाणेच केंद्र सरकारकडूनही विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहे. या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये व्हेंटिलेटर पाठविले. त्यात अकोल्याचाही समावेश असून, शनिवार २० जून रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाला तब्बल ३६ व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते. कोरोनामुळे मृत्यूचा आकडा दररोज वाढत असताना सर्वोपचार रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांना व्हेंटिलेटरसाठी वेटिंगवर राहण्याची वेळ आली होती; परंतु आता व्हेंटिलेटर मिळाल्याने आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम होणार, अशी आशा रुग्णालय प्रशासनाला होती; परंतु व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यासाठी वेळेवर तंत्रज्ञ न मिळाल्याने महिनाभर व्हेंटिलेटर कार्यान्वित झाले नव्हते. तर तंत्रज्ञ मिळाल्यानंतर व्हेंटिलेटरचा व्हॉल्व्ह जुळत नसल्याने व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यासाठी काही अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय