शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर अकोला जिल्ह्यातील  ५५ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत

By atul.jaiswal | Updated: June 14, 2024 19:01 IST

अनेक विद्युत खांब झाले होते जमीनदोस्त

अतुल जयस्वाल, अकोला : जिल्ह्याच्या आपातापा,म्हैसांग परिसरासह मूर्तिजापूर तालुक्यात चक्रीवादळासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मंगळवारी (११ जून) खंडित झालेला ५५ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आल्याची माहिती कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट यांनी दिली.जिल्ह्यात मंगळवार,११ जून रोजी संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अकोला ग्रामीण विभाग अंतर्गत अकोला ग्रामीण उपविभाग व मूर्तिजापूर उपविभागातील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर आणि अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे वादळ थांबताच कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट यांच्या नेतृत्वात तसेच उपकार्यकारी अभियंता पाल अग्रवाल, मनोज खांडरे यांच्या पुढाकाराने दुरुस्ती कार्याला युद्धस्तरावर गती देण्यात आली. शेकडो किलोमीटर वीज वाहिन्यांचे पोल टू पोल पेट्रोलिंग करून नीज वाहिनींच्या उभारणीसह तांत्रिक दोष दूर करण्यात आले. शक्य त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्थेचा वापर करून २४ तासात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

अकोला तालुक्यात झालेले नुकसान

अकोला तालुक्यातील मुख्यत्वे आपातापा उपकेंद्रास विद्युत पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही विद्युत वाहिनीचे १५ पोल जमीनदोस्त झाले होते. त्याचप्रमाणे ११ केव्ही आपातापा, ११ केव्ही म्हैसांग, ११ केव्ही रामगाव फिडरवरील १२ पोल तसेच जवळपास ४० लघुदाब वाहिन्यांचे पोल तुटल्याने ३३ केव्ही आपातापा उपकेंद्रातून विद्युत पुरवठा होत असलेल्या आपातापा, घुसर, म्हैसांग इत्यादी गावांसह एकूण ३२ गावांचा विद्युतपुरवठा खंडित झाला होता.

मूर्तिजापूर तालुक्यात झालेले नुकसान

मूर्तिजापूर उपविभागातील दुर्गवाडा विद्युत वितरण केंद्रांतर्गत ११ केव्ही भटोरी विद्युत वाहिनीचे ८ पोल व लघुदाब वाहिनीचे ३५ पोल जमीनदोस्त झाले होते. त्यामुळे भटोरी वाहिनीवरील ७ गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तसेच दुर्गवाडा व माना विद्युत वितरण केंद्रांतर्गत ३३ केव्ही दुर्गवाडा उपकेंद्र येथून निघणाऱ्या ११ केव्ही कोलसारा फिडरचे २ पोल तुटल्याने ६ गावे अंधारात गेली होती. तसेच ग्रामीण २, जामठी व कुरुम विद्युत वितरण केंद्रांतर्गत ५१ लघुदाब वाहिनींचे पोल तुटल्यामुळे १० गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

टॅग्स :electricityवीज