शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्टा प्रकल्पाचे नियोजन अंतिम टप्प्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:42 IST

अकोला: अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातील प्रकल्पाच्या कामास विलंब होत असल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत आहेत. सदर प्रकल्प कधी पूर्णत्वास जातील, असा सवाल विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी सभागृहात उपस्थित केला असता खारपाणपट्टय़ातील प्रकल्पांची आखणी व अंमलबजावणीचे नियोजन टप्प्यात असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी दिली. 

ठळक मुद्देआ. बाजोरिया यांच्या प्रश्नावर ना. फुंडकर यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातील प्रकल्पाच्या कामास विलंब होत असल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत आहेत. सदर प्रकल्प कधी पूर्णत्वास जातील, असा सवाल विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी सभागृहात उपस्थित केला असता खारपाणपट्टय़ातील प्रकल्पांची आखणी व अंमलबजावणीचे नियोजन टप्प्यात असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी दिली. अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये खारपाणपट्टय़ाचा भाग समाविष्ट होतो. खारपाणपट्टय़ातील ४ लाख १६ हजार हेक्टर जमिनीचा विकास करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या भागात नेमक्या कोणत्या विकास कामांचा समावेश असून, प्रकल्पांचे कामकाज कधी पूर्ण होईल, असा सवाल विधिमंडळात आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी उपस्थित केला. रखडलेल्या प्रकल्पांची शासन स्तरावरून चौकशी झाली का, असा प्रश्न उपस्थित करून आ. बाजोरिया यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. खारपाणपट्टय़ातील प्रकल्पांचा निर्णय जुलै २0१६ मध्ये घेण्यात आला होता. प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी त्यांची आखणी व अंमलबजावणीचे नियोजन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी दिली. 

पुलांच्या कामाला विलंब का?

  • राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. मागील काही दिवसांपासून चौपदरीकरणाच्या कामाची गती मंदावली असून, समृद्धी महामार्गाच्या कामामुळे हा परिणाम झाला का, असा प्रश्न आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी उपस्थित केला. 
  • अमरावती ते अकोला ते बाळापूर-खामगाव ते चिखलीपर्यंतच्या मार्गाचे चौपदरीकरण होत असले तरी महामार्गावर आवश्यक ठिकाणी असणार्‍या पुलांचे काम अद्यापही सुरू झाले नाही. रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण होत असतानाच पुलांचे कामही सुरू होणे गरजेचे असल्याचा मुद्दा आ. बाजोरिया यांनी उपस्थित केला. 
  • त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २0१९ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले. तसेच पुलांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला दिले. 
टॅग्स :Bhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरGopikishan Bajoriaगोपीकिशन बाजोरीयाAkola Ruralअकोला ग्रामीण