शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार भरा, कृषी संजीवनी योजनेत सहभागी व्हा!

By atul.jaiswal | Updated: November 23, 2017 13:56 IST

अकोला : आता शेतकºयांना वीज बिलाची ३० हजार रुपये थकबाकी असल्यास सुरुवातीला तीन हजार रुपये, तसेच ३० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असल्यास पाच हजार रुपये भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे.

ठळक मुद्देथकबाकीदार शेतकºयांना सवलत ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केला निर्णय

अकोला : कृषी पंपांच्या वीज बिलाची थकबाकी असणाºया शेतकºयांना थकबाकीमुक्त होण्यासाठी राज्य शासनाने आणलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेला शेतकºयांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याच्या पृष्ठभूमीवर शासनाने या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकºयांना सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. आता शेतकºयांना वीज बिलाची ३० हजार रुपये थकबाकी असल्यास सुरुवातीला तीन हजार रुपये, तसेच ३० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असल्यास पाच हजार रुपये भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. थकबाकीदारांना ही सवलत देण्याचा निर्णय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी जाहीर केला. ही रक्कम ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत भरावयाची आहे. ज्या शेतकºयांना वीज देयकाची दुरुस्ती करावयाची आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक फिडरनिहाय वीज देयक दुरुस्ती शिबिराचे आयोजन १ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०१७ या कालावधीत महावितरणतर्फे करण्यात येणार आहे.मुंबईत महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत ऊर्जा सचिव अरविंद सिंह, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार व महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे उपस्थित होते. ज्या शेतकºयांचा वीज पुरवठा वीज बिलांचा भरणा न केल्यामुळे खंडित करण्यात आलेला आहे, अशा शेतकºयांनी पैसे भरताच त्यांचा वीज पुरवठा तत्काळ जोडण्यात येणार आहे, तसेच मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणाºया ज्या शेतकºयांना आपली देयके वाढून आली आहेत, असे वाटत असेल त्यांनी फिडरनिहाय आयोजित शिबिरात सहभाग घेऊन आपली देयके तपासून घ्यावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे.कृषी पंपांना थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ ची घोषणा ३० आॅक्टोबर २०१७ ला ऊर्जा मंत्र्यांनी केली होती. या योजनेची मुदत ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत असून, या योजनेत सर्व शेतकºयांनी सहभागी होऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरण