शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

मनपा आयुक्तांसह जलवर्धन संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: August 17, 2016 02:28 IST

शोषखड्डय़ातील दोन बालकांच्या मृत्यू प्रकरणी अकोला मनपा अयुक्तासह अभियंता, कंत्राटदारावर गुन्हा.

अकोला, दि. १६ : आदर्श कॉलनीमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक १६ च्या मैदानावर मनपा प्रशासन आणि जलवर्धन संस्थेद्वारे खोदण्यात आलेल्या शोषखड्डय़ातील पाण्यात बुडून रविवारी दोन बालकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खदान पोलिसांनी बालकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या मनपा आयुक्त अजय लहाने, जलवर्धन संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी, मनपाचे संबंधित अभियंता आणि कंत्राटदार यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या शोषखड्डय़ात सिद्धार्थ राजेश घनगावकर आणि कृष्णा राकेश बहेल या दोन बालकांचा मृत्यू झाला होता.आदर्श कॉलनी परिसरातील मित्रनगरला लागून असलेल्या वसाहतमधील रहिवासी राजेश घनगावकर यांचा मुलगा सिद्धार्थ (७) आणि याच परिसरातील रहिवासी राकेश बहेल यांचा मुलगा कृष्णा (१0) हे दोघे मनपाच्या शाळा क्रमांक १६ च्या मैदानावर खेळत होते. या मैदानावर मनपा प्रशासन आणि जलवर्धन या संस्थेने खोल चर खोदलेले होते. यामध्येच १0 फूट खोलीचे तीन शोषखड्डे खोदण्यात आले होते. या शोषखड्डय़ांचे बांधकाम पूर्ण न केल्याने खड्डय़ात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. कृष्णा आणि सिद्धार्थ हे दोघे येथे खेळत असतानाच ते शोषखड्डय़ात पडले. शोषखड्डय़ात गाळ असल्याने दोघेही या गाळात फसून त्यांचा मृत्यू झाला. जलवर्धन संस्थेने बांधलेल्या या तीन शोषखड्डय़ांची कामे त्यांनी अर्धवट केली होती. त्यामुळे दोन बालकांचा बळी गेला. जलवर्धन संस्थेने केलेल्या अर्धवट कामामुळे आणि मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दोन चिमुकल्यांचा जीव गेला असून, या प्रकरणी सिद्धार्थचे वडील राजेश घनगावकर यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून मनपा आयुक्त अजय लहाने, जलवर्धन संस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी, मनपाचे संबंधित अभियंता, कंत्राटदार यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0४ अ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिका-यांवरील गुन्हे ह्यअजामीनपात्रह्णमनपा आयुक्तांसह जलवर्धन संस्थेच्या पदाधिकार्‍यांविरुद्ध खदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे नॉन बेलेबल असल्याची माहिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणातील जलवर्धन संस्थेच्या अध्यक्ष पदाधिकार्‍यांसह संबंधित अधिकार्‍यांना पोलिसांनी तत्काळ अटक करण्याची मागणी बालकांच्या नातेवाइकांनी केली आहे.