अकोला, दि. २0- दुसर्याच व्यक्तीच्या दस्तावेजाचा वापर करून व बनावट स्वाक्षरी करीत सिमकार्ड खरेदी-विक्री करणार्यांविरुद्ध आकोट फैल पोलिसांनी मंगळवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आकोट फैल परिसरातील रहिवासी शीतल अनंत मुके यांच्या दस्तावेजांचा वापर करून आणि त्यांची बनावट स्वाक्षरी करून याच परिसरातील रहिवासी तसेच किराणा दुकान चालक अवधेश चौरसिया याने बोगस सिमकार्ड खरेदी केले. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आकोट फैल पोलिसांनी सदर इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यात येत असून, बोगस सिमकार्ड प्रकरणांचे २0 च्या वर गुन्हे दाखल केले आहेत.
बोगस सिमकार्डप्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Updated: September 21, 2016 02:01 IST