शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अकोट पोलिसांना हातपाय तोडण्याची धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 17:18 IST

पोलिसांना धमकी देणं महागात पडले, गुन्हा दाखल.

अकोट : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाउनची अंमलबजावणी करणाºया पोलिस कर्मचाºयांच्या कामात अडथळा आणून त्यांना शिवीगाळ करीत हातपाय तोडण्याची धमकी देणाºया अकोट शहरातील एका युवकाविरुद्ध पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. ताज शरीफ राणा (३० रा. कांगारपुरा, अकोट) असे या आरोपीचे नाव आहे. अकोट शहरात गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांना काही युवकांनी शिविगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा व्हिडीओ सोशल व्हिडीओवर चांगलाच व्हायरल झाला आहे. अकोट शहरातील शौकत अली चौकात तैनात असलेल्या दोन पोलिस कर्मचाºयांनी लॉकडाउन असताना बाहेर फिरणाºया काही युवकांना हटकले असता, या युवकांनी थेट पोलिसांसोबत हुज्जत घातली. एवढेच नव्हे, तर पोलिसांना शिविगाळ करत हे युवक पोलिसांना पाय तोडून हातात देऊ, अशी धमकीही देत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. शौकत अली चौकाजवळच्या अमीन पुरा भागातील हा व्हिडीओ १७ मे रोजीचा असून,लॉकडाउन असताना मोठ्या संख्यने या ठिकाणी जमाव झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओची चौकशी केली असता, ताज शरीफ राणा हा एएसआय राऊत, पोकाँ. वरोठे, पोहेकाँ डामरे यांना अश्लील शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी देताना दिसत आहे. १७ मे रोजी कर्मचारी हे कर्मचारी कर्तव्यावर असताना धारूळवेस भागात पेट्रोलिंग करीत होते. लॉकडाउन असल्याने त्यांनी रस्त्यावर फिरत असलेल्या काही तरुणांना घरी जाण्यास सांगितले असता आरोपीने अश्लील शिवीगाळ करून हात पाय तोडण्याची धमकी दिली. या प्रकरणी अकोट शहर पोलीस निरिक्षक संतोष महल्ले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोट शहर पोलीस स्टेशनला आरोपी ताज शरीफ राणाविरुध्द भादंवी २६९, २९४,५०४,५०६,१८८ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :akotअकोटPoliceपोलिस