शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

एकच उमेदवारी अर्ज दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:24 IST

अकोला: जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवार, १५ सप्टेंबरपासून सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी जिल्हय़ातील मूर्तिजापूर तालुक्यात केवळ एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

ठळक मुद्दे२७२ ग्रामपंचायतींची निवडणूक ऑनलाइन उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवार, १५ सप्टेंबरपासून सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी जिल्हय़ातील मूर्तिजापूर तालुक्यात केवळ एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.पाच वर्षांचा कालावधी संपणार्‍या जिल्हय़ातील अकोला, अकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, तेल्हारा, पातूर आणि मूर्तिजापूर या सातही तालुक्यांतील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या निवडणुकीत थेट जनतेतून निवड करावयाच्या सरपंच पदांसह ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू झाली. ग्रामपंचायतींची  निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरावयाचा असून, ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (प्रिंट) संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर करणे आवश्यक आहे. १५ ते २२ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ४.३0 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येतील आणि ऑनलाइन भरलेल्या उमेदवारी अर्जांची ‘प्रिंट’सायंकाळी ५ वाजेपर्यंत  संबंधित तहसील कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल करता येईल. ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी जिल्हय़ातील सातही तालुक्यांपैकी  मूर्तिजापूर तालुक्यात केवळ एक उमेदावारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

तहसील कार्यालयात उसळली गर्दी!ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याच्या पृष्ठभूमीवर ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करताना लागणारे दाखले, प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची माहिती घेण्यासाठी शुक्रवारी अकोला तहसील कार्यालय परिसरात इच्छुक उमेदवारांसह सर्मथकांची गर्दी उसळली होती. काही इच्छुक उमेदवारांनी मतदार याद्यांच्या नकलादेखील घेतल्या. नागरिकांची गर्दी झाल्याने, तहसील कार्यालय परिसर मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.

सोनाळय़ात एक अर्ज दाखलमूर्तिजापूर : तालुक्यातील सोनाळा ग्रामपंचायतीच्या प्रभाग २ मधून अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ईश्‍वर दादाराव डाबेराव यांनी उमदेवारी अर्ज दाखल केला. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर पितृपक्षाचे सावट!ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली; मात्र, २0 सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष असल्याने, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदतीच्या शेवटच्या दोन दिवसांत २१ व २२ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर पितृपक्षाचे सावट आहे.