शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविरुद्ध लढाई : संवेदनशील भागात ‘डोअर-टू-डोअर’ सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 17:15 IST

मदतीचा हात देण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक पुढे आले आहे.

अकोला : अकोल्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. ज्या भागात हे रुग्ण गवसले, तो संपूर्ण भाग सील करण्यात आला. आता या भागातील नागरिकांना कोरोनाची लागण झाली का, हे शोधण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. या कामात मदतीचा हात देण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक पुढे आले आहे.अकोल्यातील बैदपुरा, अकोट फैलसह पातूरमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने हा संपूर्ण परिसर पिंजून काढला जात आहे. दररोज या भागातील प्रत्येक कुटुंबांच्या घरी आरोग्य सेवक, आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस भेट देत आहे. नागरिकांच्या आरोग्याची ते विचारपूस करीत आहे. यात त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. संपूर्ण यंत्रणा नागरिकांना सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आहे का, याचे सर्वेक्षण करीत आहे.हे सर्व सर्वेक्षक आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतात. यापैकी काही आशांना वाईट अनुभव आले; मात्र नागरिकांना तुमच्याच भल्यासाठी हे सर्वेक्षण असल्याचे सांगितल्यानंतर प्रतिसाद मिळतो. तथापि, अनेकदा अपशब्द, अपमान सहन करावा लागतो, असे त्यांनी सांगितले; मात्र राष्टÑीय कार्य पूर्ण करायचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कामात झोकून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अकोल्यातील काही भागात आशा स्वयंसेविकांना शिवीगाळही झाली; पण त्यांच्या पाठीशी प्रशासन ठामपणे उभे राहिल्याने त्यांनी आपले काम सुरूच ठेवले आहे.भीती आहे; पण कोणी तरी पुढाकार घेतलाच पाहिजे ना?कोरोना आपल्या मागे तर येणार नाही ना, अशी भीती अनेक आशा स्वयंसेविकांना वाटते; मात्र दुसऱ्याच क्षणी अशी चिंता दूर सारत त्या प्रामाणिकपणे काम करतात. घाबरून कसे चालेल? आपली वैयक्तिक काळजी घेऊन हे काम कोणाला तरी करावे लागणारच ना, अशा भावना त्यांच्या आहेत.

आमचीही तपासणी कराआशा व इतर कर्मचारी सर्वेक्षणात व्यस्त आहेत. त्यांना खबरदारी घेऊनही अनपेक्षितपणे संसर्ग झालाच, तर त्वरित माहिती मिळणे शक्य नाही. यामुळे सर्वेक्षणाचे काम आटोपल्यानंतर आमचीही आरोग्य तपासणी करावी, असे मत काही आरोग्य सेविकांनी व्यक्त केले.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला