शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाशी लढा; २८ दिवसांपर्यंत अकोट फाइल  प्रतिबंधित क्षेत्र कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 17:42 IST

पुढील 28 दिवसांपर्यंत अकोट फाइल परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

अकोला : शहरातील उत्तर झोन अंतर्गत येणाऱ्या अकोटफाइल परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला 30 वर्षीय रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरा झाला. चाचणी दरम्यान या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला 27 एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयात रुग्णालय प्रशासनाने घरी जाण्याची अनुमती दिली. असे असले तरीही पुढील 28 दिवसांपर्यंत अकोट फाइल परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.महापालिका क्षेत्रात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सात एप्रिल रोजी उत्तर झोनमधील प्रभाग क्रमांक 11 मध्ये आढळून आला होता. त्यानंतर दुसºयाच दिवशी म्हणजे आठ एप्रिल रोजी कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण प्रभाग क्रमांक दोन अंतर्गत येणाºया अकोट फाइल परिसरात आढळून आला होता. कोरोना विषाणूच्या संदर्भात केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेता महापालिका आयुक्त संजय कापडणीस कापडणीस यांनी पुढील 28 दिवसांपर्यंत म्हणजेच 25 मे पर्यंत अकोट फाइल परिसर प्रतिबंधित क्षेत्र कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.पुन्हा बाधीत होण्याचा धोका?संपूर्ण जगभरात थैमान घालणाºया कोरोना विषाणूने बाधित झालेले रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात की नाही याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेले रुग्ण उपचारादरम्यान पूर्णपणे बरे झाल्यानंतरही संबंधित रुग्णांनी घरांमध्येच 14 दिवस वेगळे राहणे अत्यंत गरजेचे आहे.कोरोनातून मुक्त झालेल्या अकोटफाइल परिसरातील युवकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली असली तरीही शासनाच्या निर्देशानुसार पुढील 28 दिवसांपर्यंत अकोटफाइल भागातील प्रतिबंधित क्षेत्र कायम राहणार आहे. यादरम्यान नागरिकांना कोणतीही सवलत देण्यात आली नाही, हे निश्चित समजावे.- संजय कापडणीस आयुक्त, मनपा

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याAkot Failअकोट फैल