शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

पाचवे बालकुमार साहित्य संमेलन आजपासून अकोल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 22:58 IST

विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेतर्फे आयोजित दोन दिवसीय ५ वे बालकुमार साहित्य संमेलन प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशिम रोड, अकोला येथे १ व २ डिसेंबर रोजी होत आहे. संमेलनाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, संमेलन स्थळ साने गुरुजी साहित्य नगरी बालक-पालक, नामवंत साहित्यिक, सिने कलावंतांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.

ठळक मुद्देसाने गुरुजी साहित्य नगरी सज्जसिने कलावंत मेघना एरंडेची प्रमुख उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला (साने गुरुजी साहित्य नगरी) : विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेतर्फे आयोजित दोन दिवसीय ५ वे बालकुमार साहित्य संमेलन प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशिम रोड, अकोला येथे १ व २ डिसेंबर रोजी होत आहे. संमेलनाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, संमेलन स्थळ साने गुरुजी साहित्य नगरी बालक-पालक, नामवंत साहित्यिक, सिने कलावंतांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. डबिंग व सिने कलावंत मेघना एरंडे-जोशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शुक्रवारी, सकाळी ९ वाजता भाषा गौरव दिंडी व विविध साहित्य दालनांच्या उद्घाटनाने संमेलनाला प्रारंभ होणार आहे. लोक साहित्य या मुख्य संकल्पनेवर आधारित दिंडीमध्ये अकोला जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आणि शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी लेजीम, वासुदेव, ओवी व शेतकरी गीत, जोगवा, गोंधळ, अभंग, पोतराज तसेच कोळीगीत, भारुड, लावणी, पोवाडा आणि कीर्तन आदी प्रकार सादर करतील. 

संमेलनातील विविध आकर्षणातील साहित्य दालनांमध्ये लोककवी डॉ.विठ्ठल वाघांची साहित्य गुहा, मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत भाषांची समृद्ध दालने, संत साहित्य, कविता लेखन व वाचन, बालचित्रांची दुनिया आणि काष्ठचित्र दालन, पक्षी व निसर्ग चित्र, छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे मुख्य उद्घाटन सत्र सकाळी १0.३0 वाजता प्रारंभ होईल. बाल साहित्यिक व संमेलनाध्यक्ष शंकर कर्‍हाडे यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ.संगीता बर्वे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी डबिंग व सिने कलावंत मेघना एरंडे-जोशी यांची प्रमुख उपस्थिती राहील. 

दुपारी १.३0 वाजता सिने कलावंत मेघना एरंडे-जोशी यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले आहे. विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या फक्त निवासी बालकुमार प्रतिनिधींसाठी कॅम्प फायर असून, यामध्ये धमाल मनोरंजनाचे कार्यक्रम राहणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ.गजानन नारे, स्वागताध्यक्ष प्रा.ललित काळपांडे, समन्वयक सीमा शेटे-रोठे यांनी दिली. 

‘मला काही तरी सांगायचे’ परिसंवाद दुपारी ३.३0 वाजता शकुंतलाबाई मालोकार स्मृती सर्मपित बालक-पालकांसाठी ‘मला काही तरी सांगायचे’ या विषयावर व्याख्याते सचिन बुरघाटे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. या परिसंवादात विविध जिल्ह्यांमधील व शाळांमधील बालकुमार प्रतिनिधी सहभाग घेणार आहेत.

टॅग्स :Akola cityअकोला शहर