शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वीकृत’साठी इच्छुकांची फिल्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 02:01 IST

महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लागावी, यासाठी राजकीय पक्षांकडे इच्छुकांनी पद्धतशीरपणे फिल्डिंग लावली आहे. सत्ताधारी भाजपाच्या गोटात तीन जणांच्या नावावर चर्चा केली जात असली, तरी ऐनवेळेवर फेरबदल होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसची यादी प्रदेशाध्यक्षांकडेभाजपमध्ये उत्कंठा शिगेला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लागावी, यासाठी राजकीय पक्षांकडे इच्छुकांनी पद्धतशीरपणे फिल्डिंग लावली आहे. सत्ताधारी भाजपाच्या गोटात तीन जणांच्या नावावर चर्चा केली जात असली, तरी ऐनवेळेवर फेरबदल होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. काँग्रेसने ५२ पेक्षा अधिक इच्छुकांची यादी पक्षश्रेष्ठींकडे सादर केल्याची माहिती आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना दोन्ही पक्ष न्यायालयीन फेर्‍यात अडकल्यामुळे इच्छुकांचा हिरमोड होणार असल्याचे चित्र आहे. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी महिन्यात आटोपल्यानंतर ९ मार्च रोजी महापौर, उपमहापौरांचा पदग्रहण सोहळा पार पडला. अकोलेकरांनी मनपाच्या वतरुळात पहिल्यांदाच राजकीय पक्ष म्हणून भाजपाला स्पष्ट बहुमत देत महापालिकेची सत्ता सोपवली. सत्ताधारी भाजपाचा उत्साह पाहता महिनाभरात स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रि या पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. आठ महिन्यांच्या कालावधीनंतर का होईना, २३ नोव्हेंबर रोजी स्वीकृत सदस्यांची निवड करण्यासाठी मनपात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाचे ४९ नगरसेवक असून, संख्याबळानुसार पक्षाकडून तीन सदस्यांची निवड केली जाईल. काँग्रेसचे १३ नगरसेवक असून, निकषानुसार एका सदस्याची निवड होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित लोकशाही आघाडी व शिवसेनेच्या आघाडीचे संख्याबळ समसमान नऊ आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेच्या आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यामुळे राकाँ व सेनेचा एक सदस्य वगळता उर्वरित चार सदस्यांची निवड करण्याचा आदेश नागपूर हायकोर्टाने दिला आहे. त्यामुळे सभागृहात चार सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडेल. 

गोखलेंची वाट बिकट?मनपा निवडणुकीत पक्षाने दोन वेळा तिकीट नाकारलेल्या भाजयुमोचे पदाधिकारी गिरीश गोखले यांची संघटनेच्या वरिष्ठ स्तरावर मजबूत बांधणी असल्याचे बोलल्या जाते. निदान स्वीकृतच्या माध्यमातून मनपाच्या सभागृहात प्रवेश करण्यासाठी गोखले यांनी नागपूर हायकोर्टापर्यंत धाव घेतली. स्वीकृतसाठी गोखले यांचे नाव निश्‍चित मानल्या जात असले, तरी पक्षांतर्गत वातावरण पाहता गोखले यांची वाट बिकट असल्याची चर्चा पक्षात सुरू आहे. 

निवडणूक लढणार्‍यांना संधी नाही!मनपात कधीकाळी सर्वात मोठा पक्ष असणार्‍या काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पक्षाने ५२ पेक्षा अधिक इच्छुकांची यादी पक्षश्रेष्ठींकडे सादर केल्याची माहिती आहे. यातही ज्या उमेदवारांना मनपा निवडणुकीत उमेदवारी मिळाली होती, त्यांना स्वीकृतसाठी पुन्हा संधी दिली जाणार नसल्याचे बोलल्या जात आहे. स्वीकृत सदस्य पदाच्या माध्यमातून काँग्रेस मराठा कार्ड खेळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरMuncipal Corporationनगर पालिका