शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणंद रस्त्यांची कामे अडकली आराखड्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 13:27 IST

अकोला: पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाणंद रस्ते कामांसाठी गत जूनमध्ये निधी वितरित करण्यात आला; मात्र तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांकडून एकाही तालुक्यातील कामांचा कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना कक्षाकडे २८ आॅगस्टपर्यंत सादर करण्यात आला नाही.

ठळक मुद्देकृती आराखडे तालुका स्तरावर अडकल्याने, जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांची कामे रखडली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गत जूनमध्ये जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर वितरित करण्यात आला.

अकोला: पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाणंद रस्ते कामांसाठी गत जूनमध्ये निधी वितरित करण्यात आला; मात्र तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांकडून एकाही तालुक्यातील कामांचा कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना कक्षाकडे २८ आॅगस्टपर्यंत सादर करण्यात आला नाही. त्यामुळे निधी उपलब्ध असूनही, पाणंद रस्त्यांची कामे तालुकास्तरावरील कृती आराखड्यात अडकली आहेत.गत २७ फेबु्रवारी २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार पालकमंत्री पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाणंद रस्ते कामांसाठी शासनामार्फत १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यानुषंगाने पाणंद रस्ते कामांचा कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो कक्षामार्फत जिल्ह्यातील सातही तहसीलदार, पंचायत समितींचे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले. वारंवार पत्राद्वारे निर्देश देण्यात आल्यानंतरही जिल्ह्यातील सातपैकी एकाही तालुक्यातून तहसीलदार व गटविकास अधिकाºयांमार्फत पाणंद रस्ते कामांचा कृती आराखडा २८ आॅगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो कक्षाकडे प्राप्त झाला नाही. पाणंद रस्ते कामांचे कृती आराखडे तालुका स्तरावर अडकल्याने, जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांची कामे रखडली आहेत. त्यामुळे निधी उपलब्ध असतानाही जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांची कामे तालुकास्तरावरील कृती आराखड्यात अडकली आहेत.निधी वितरित; पण कामे रखडली!पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांसाठी शासनामार्फत प्राप्त १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गत जूनमध्ये जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर वितरित करण्यात आला. त्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील कामांसाठी २१ लाख ५० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला; मात्र उपलब्ध निधीतून करावयाच्या कामांचे कृती आराखडे तहसीलदार व गटविकास अधिकाºयांकडून २८ आॅगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो कक्षाकडे सादर करण्यात आले नाही. त्यामुळे निधी वितरित करण्यात आला असला तरी, पाणंद रस्त्यांची कामे मात्र रखडली आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय