शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ऐन सणासुदीच्या दिवसांत मूलभूत सुविधांची बोंबाबोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 13:22 IST

ऐन सणासुदीच्या दिवसांत शहराच्या गल्लीबोळांसह मुख्य बाजार तसेच सार्वजनिक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याचे किळसवाणे चित्र समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिका प्रशासन तसेच सत्ताधारी भाजपच्यावतीने शहरात स्वच्छता राखण्याचा गवगवा केला जात असतानाच, ऐन सणासुदीच्या दिवसांत शहराच्या गल्लीबोळांसह मुख्य बाजार तसेच सार्वजनिक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याचे किळसवाणे चित्र समोर आले आहे. साफसफाईच्या मुद्यावर मनपाच्या स्वच्छता विभागाचा कारभार हवेत सुरू असून, ‘अच्छे दिन’चे आश्वासन देणाऱ्या सत्ताधारी भाजपप्रती अकोलेकरांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.सर्वांचा लाडका असणाºया गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले आहे. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांनी भव्य मंडप उभारले असून, आकर्षक रोषणाई केली आहे. सणासुदीच्या निमित्ताने शहरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच दुसरीकडे सर्वत्र पसरलेली घाण व अस्वच्छतेमुळे विविध साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता बळावली आहे.‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत २०१४ पासून केंद्र व राज्य शासनाकडून मनपा प्रशासनाला स्वच्छतेच्या कामासाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होत आहे. यामध्ये घंटागाड्यांची खरेदी करण्यापासून ते दैनंदिन साफसफाईच्या कामासाठी तरतूद करण्यात आली आहे. सप्टेंबर २०१४ पासून महापालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात असताना मागील पाच वर्षांच्या कालावधीत शहरातील घाणीचे किळसवाणे चित्र दूर करण्यात सत्ताधारी सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप होऊ लागला आहे. प्रशासनाने मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाण, बाजारपेठ तसेच प्रभागांमधील अंतर्गत रस्ते, सर्व्हिस लाइन, नाल्या आदींची दैनंदिन साफसफाई करणे क्रमप्राप्त असताना स्वच्छता विभागाची मुजोरी अकोलेकरांच्या आरोग्यावर उठल्याचे दिसून येत आहे.

क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक सुस्तावले!आरोग्य निरीक्षकांकडून दैनंदिन स्वच्छतेची माहिती घेऊन त्यांना सूचना, निर्देश देण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आहे. तसेच प्रत्येक प्रभागात प्रत्यक्षात पाहणी करण्याचे काम आरोग्य निरीक्षकाचे आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरात ठिकठिकाणी घाण, अस्वच्छता साचल्यामुळे क्षेत्रीय अधिकाºयांसह आरोग्य निरीक्षकांवर महापालिका आयुक्तांचा वचक नसल्याचे चित्र समोर आले आहे.

२९ कोटींच्या बदल्यात कोणती स्वच्छता?संपूर्ण शहरात साफसफाईचा फज्जा उडाला असताना मनपाच्या आस्थापनेवरील ७४८ कर्मचाºयांचे वेतन आणि पडीत वॉर्डांतील साफसफाई करणाºया खासगी कंत्राटदारांच्या देयकापोटी प्रशासन वर्षाकाठी तब्बल २९ कोटी रुपयांची उधळपट्टी करीत असल्याची माहिती आहे. या २९ कोटींच्या बदल्यात शहरात नेमकी कोणती स्वच्छता राखली जाते, याचे मूल्यमापन आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह महापौर विजय अग्रवाल करतील का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका