शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षदिनी मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा साडी-चोळी देऊन सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 16:31 IST

अकोल्यातील व्यक्तिमत्त्व सुनील गोहर यांनी गुढीपाडवा या हिंदू नववर्षदिनी जिल्हा स्त्री रुग्णालयात २२ मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा साडी-चोळी व मिठाई देऊन सन्मान केला.

अकोला : ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’, हा संदेश जवळपास सर्वच जण देतात. त्याकरिता सर्वच स्तरातून प्रयत्नसुद्धा मोठ्या प्रमाणावर शासन तथा प्रशासनाकडून केले जात आहेत. आजघडीला त्याला मोठ्या प्रमाणात यशसुद्धा मिळाले; पण मुलींच्या जन्माचे कौतुक आगळ्या-वेगळ्या रीतीने व्हावे, हा चंग मनाशी बाळगून एक ध्येयवेडे अकोल्यातील व्यक्तिमत्त्व सुनील गोहर यांनी गुढीपाडवा या हिंदू नववर्षदिनी जिल्हा स्त्री रुग्णालयात २२ मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा साडी-चोळी व मिठाई देऊन सन्मान केला. इतर २९ मातांनासुद्धा साडी-चोळी देऊन गौरविले तसेच त्यांनी या मातांना मतदान करण्याची विनंतीदेखील केली. यावेळी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पाटील, रोशनी गोहर, प्रमोद डेंगे, हरीश पवार, शिवा जयपिल्ले व भोलेशंकर धामणे प्रामुख्याने उपस्थित होते.हिंदू नववर्षदिनी सामाजिक कार्यकर्ते सुनील गोहर हे नेहमीच ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’, हा संदेश जनमानसापर्यंत आपल्या परीने पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असतात. नववर्ष व नवीन मुलींचा जन्म हा योगायोग साधून त्यांनी ५१ साडी-चोळींचे वितरण जिल्हा स्त्री रुग्णालयात हा उपक्रम राबविला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.  

 

टॅग्स :Akolaअकोलाgudhi padwaगुढीपाडवा