शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

इयत्ता दहावीच्या पूर्व व्यावसायिक विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या शुल्कात २0 पट वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 14:42 IST

शिक्षण मंडळ पुणे यांनी २७ नोव्हेंबर रोजी नव्याने आदेश काढत तब्बल ४00 रुपये शुल्क वाढ करीत, हे शुल्क विद्यार्थ्यांकडून वसूल करण्याचा आदेश शिक्षण मंडळाने दिला आहे.

- नितीन गव्हाळेअकोला: इयत्ता दहावी परीक्षा माध्यमिक स्तर पूर्व व्यावसायिक विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षासाठीचे अर्ज आणि शुल्क विद्यार्थ्यांनी ६ ते २३ नोव्हेंबरदरम्यान भरले असताना, शिक्षण मंडळ पुणे यांनी २७ नोव्हेंबर रोजी नव्याने आदेश काढत तब्बल ४00 रुपये शुल्क वाढ करीत, हे शुल्क विद्यार्थ्यांकडून वसूल करण्याचा आदेश शिक्षण मंडळाने दिला आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज आणि प्रतिविषय २0 रुपयेप्रमाणे शुल्क भरल्यानंतर आता बोर्डाला जाग आली आणि बोर्डाने विद्यार्थ्यांकडून प्रतिविषय १00 रुपयेप्रमाणे ४00 रुपये वसूल करण्यास बजावले. बोर्ड वरातीमागून घोडे दामटवून विद्यार्थ्यांवर अन्याय करीत असल्याचा आरोप ‘विजुक्टा’ने केला आहे.दहावीतील व्यावसायिक विषय घेऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी व्ही १, व्ही २, व्ही ३ आणि व्ही ४ या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी प्रतिविषय २0 रुपयेप्रमाणे शुल्क घेतल्या जात होते. विद्यार्थ्यांनी अर्ज आणि प्रतिविषय २0 रुपयेप्रमाणेच अर्ज भरले; परंतु शासन आदेशानुसार दहावीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रचलित असलेल्या ही १, व्ही २, व्ही ३ आणि व्ही ४ विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी कौशल्य चाचणी शुल्क प्रतिप्रशिक्षणार्थी ४00 रुपये शुल्क आकारण्यात यावे, असे राज्य मंडळास कळविले आहे. मार्च २0१९ पासून घेणाºया दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट होणाºया विद्यार्थ्यांकडून आता नव्याने शुल्क आकारण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज आणि शुल्क भरल्यानंतरही त्यांच्याकडून पुन्हा शुल्क वसूल करणे हे अन्यायकारक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ४00 रुपये शुल्क परवडणारे नसून, ही शुल्क वाढ शिक्षण मंडळाने मागे घ्यावी, अशी मागणी विदर्भ ज्युनिअर टीचर्स असोसिएशनने शिक्षण मंडळाकडे केली आहे. शासनाने प्रतिविषय २0 रुपयेप्रमाणे चार विषयांसाठी ८0 रुपयांवरून तब्बल २0 पट वाढ करीत, शुल्क ४00 रुपये करून विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. एकीकडे कौशल्य व उद्योजकतेला प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असताना, परीक्षा शुल्कात केलेल्या वाढीमुळे गरीब विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळतील का, असा प्रश्नही ‘विजुक्टा’चे प्रांताध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात बोर्डाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

व्यावसायिक विषयांच्या परीक्षेचे अर्ज आणि शुल्क विद्यार्थ्यांनी भरले असताना, बोर्डाने ४00 रुपये शुल्क वाढ करून विद्यार्थ्यांकडून ते वसूल करण्यास सांगितले आहे. २0 पट शुल्क वाढ करून बोर्डाने गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. विद्यार्थी व पालकांची ४00 रुपये शुल्क भरण्याची क्षमता नाही.डॉ. अविनाश बोर्डे, प्रांताध्यक्ष विजुक्टा.

 

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र