शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या ताब्यातील चिमुकली आईच्या स्वाधीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 02:13 IST

अकोला : कौटुंबिक वादातून वडिलांनी ११ महिन्यांच्या चिमुरड्या मुलीला आईपासून अलिप्त केले. शेवटी आईचे काळीजच ते. पोटच्या गोळय़ापासून ती कशी अलिप्त राहील. अखेर तिने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि मुलीला ताब्यात देण्याची विनवणी न्यायालयाला केली. न्यायालयानेही तिच्या ममतेची जाणीव ठेवत चिमुरडीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्याचा वडिलांना आदेश दिला. 

ठळक मुद्देन्यायालयाचा आदेश पती-पत्नीतील वाद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कौटुंबिक वादातून वडिलांनी ११ महिन्यांच्या चिमुरड्या मुलीला आईपासून अलिप्त केले. शेवटी आईचे काळीजच ते. पोटच्या गोळय़ापासून ती कशी अलिप्त राहील. अखेर तिने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि मुलीला ताब्यात देण्याची विनवणी न्यायालयाला केली. न्यायालयानेही तिच्या ममतेची जाणीव ठेवत चिमुरडीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्याचा वडिलांना आदेश दिला. मे २0१६ मध्ये जुने शहरातील युवतीचा शिवणीतील युवकाशी विवाह झाला. पुढे त्यांना मुलगी झाली. सुखी संसाराचे स्वप्न रंगवित असतानाच, पतीने पत्नीची आई व आजीला लग्नात हुंडा कमी दिला. सोन्याचे दागिने दिले नाहीत म्हणून वाद घातला. या वादात पतीने पत्नीच्या आई व आजीला शिवीगाळ करून मारहाण केली आणि पत्नीसह त्यांनाही घराबाहेर हाकलून दिले. चिमुरड्या मुलीलाही त्याने ताब्यात घेतले. मुलीचे तोंड पाहू देणार नसल्याची तंबीही त्याने पत्नीला दिली. चिमुरड्या मुलीसाठी आई आसुसली होती. परंतु, पती तिला भेटू देईना. अखेर पत्नीने एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तिला महिला तक्रार निवारण कक्षाकडे पाठविले. परंतु, तिथेही न्यायासाठी तिला काही महिने वाट पाहावी लागणार असल्याने तिने, न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आणि मुलगी मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणात न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. न्यायालयाने आईच्या भावना लक्षात घेत, मुलगी तिच्या ताब्यात देण्याचा पतीला आदेश दिला. न्यायालयाच्या आदेशानंतर मुलगी ताब्यात मिळाल्यानंतर तिने मुलीला घट्ट मिठी मारली. 

 

टॅग्स :Courtन्यायालय