शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

बाप, सावत्र बाप अन् काका झाला हैवान; १० वर्षांच्या चिमुरडीवर जन्मदात्याचा अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 05:31 IST

पोलिस तपासादरम्यान चिमुरडीवर जन्मदात्या बापानेही दारू पिऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, अकोला : जन्मदात्या बापासह, सावत्र बाप आणि काका यांनीच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या तीन घटना गुरुवारी उजेडात आल्याने पुन्हा एकदा समाजमन सुन्न झाले. यातील एक घटना अकोला जिल्ह्यात तर दोन घटना पालघर जिल्ह्यात घडल्या आहेत.  

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दहा वर्षांच्या चिमुरडीवर वडिलांच्या नात्यातील एका वीस वर्षीय युवकाने अत्याचार केला. याप्रकरणी युवक अटकेत असतानाच आता पोलिस तपासादरम्यान त्या चिमुरडीवर जन्मदात्या बापानेही दारू पिऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी त्या नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलीचे आई-वडील नातेवाइकांकडे आले होते. अल्पवयीन मुलीला त्यांच्याकडे ठेवून दोघे बाहेर गेले. यावेळी मुलीच्या वडिलांचा नातेवाईक असलेला यश युवराज गवई याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी सुरू केल्यावर जन्मदात्या बापानेही अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे  स्पष्ट झाले.  

वसईत सावत्र पिता आणि काकांकडून बलात्कार

नालासोपारा : वसईत एका घटनेत सावत्र पिताच १५ वर्षीय मुलीवर तीन महिन्यांपासून बलात्कार करत होता, तर दुसऱ्या घटनेत काकाने आपल्या १७ वर्षीय पुतणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला आहे. तुळींज व पेल्हार पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळ्या प्रकरणांत बलात्कार, पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. 

- पहिल्या घटनेत ४० वर्षीय सावत्र पित्याने १५ वर्षीय मुलीवर सतत तीन महिने बलात्कार केला. अखेर तिने मंगळवारी आईला हा प्रकार सांगितला. पोलिसांनी आरोपी सावत्र पित्याला अटक केली. 

- दुसऱ्या घटनेतील पीडित मुलगी १७ वर्षांची आहे. मंगळवारी दहिसर येथे राहणारे काका तिच्या घरी आले. तेव्हा घरी कुणी नव्हते. त्याने तिला धमकावून तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला.  

टॅग्स :Akolaअकोलाsexual harassmentलैंगिक छळ