शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिते आधी पदभरतीच्या प्रक्रियेचा फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 12:32 IST

अकोला: मराठा आरक्षणाची न्यायालयीन प्रक्रिया, लोकसभेनंतर ॅहोणाऱ्या विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया पाहता राज्य शासनाने घोषीत केलेली विविध पदांची भरती डिसेंबर २०१९ नंतरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.

अकोला: मराठा आरक्षणाची न्यायालयीन प्रक्रिया, लोकसभेनंतर ॅहोणाऱ्या विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया पाहता राज्य शासनाने घोषीत केलेली विविध पदांची भरती डिसेंबर २०१९ नंतरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यातच पदभरतीतील आरक्षित पद संख्येमध्ये बदल तसेच भरती रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवल्याने राज्यात सत्तांतर झाल्यास भरती प्रक्रियेचे काय होईल, या चिंतेत आता राज्यातील बेरोजगार आहेत. विशेष म्हणजे, येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने तातडीने पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करीत त्यातून बेरोजगारांच्या असंतोषाला बांध घालण्याचा प्रयत्न होत आहे.जिल्हा परिषदेतील वर्ग-३ मधील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीऐवजी शासन आॅनलाइन परीक्षेतून करणार असल्याचा शासन निर्णय २४ आॅगस्ट २०१७ रोजी घेण्यात आला. वर्षभर त्यावर कोणतीच अंमलबजावणी न करता नोकर भरतीची आॅनलाइन प्रक्रिया जिल्हा परिषदेकडेच ठेवण्याचा निर्णय २३ जुलै २०१८ रोजी घेण्यात आला. या दोन आदेशातील कालावधी पाहता शासनाने नोकर भरतीसाठी सातत्याने टाळाटाळ केल्याचे स्पष्ट होते.जिल्हा परिषदेत नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-क संवर्गातील पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीकडून प्रक्रिया पार पाडली जायची. २४ आॅगस्ट २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा निवड समितीकडून ही भरती प्रक्रिया काढून घेण्यात आली. नव्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदभरतीची प्रक्रिया आॅनलाइन राबवतील. शासन स्तरावरून निवड झालेल्या उमेदवाराला मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्राधिकारी म्हणून नियुक्ती देतील.त्याच शासन निर्णयात ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यभर या पदांची परीक्षा घेण्यात येईल; मात्र आताच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यास किती वेळ लागेल, ही बाब ‘लोकमत’ने २४ जुलै २०१८ रोजीच प्रसिद्ध केली होती. सात महिने उलटल्यानंतर ऐन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाने आता पदभरतीच्या जाहिरातींचा भडिमार सुरू केला आहे. त्यातून येत्या काळातील निवडणुकीची आचारसंहिता पाहता ही पदभरती कधी होईल, या विचाराने बेरोजगार कमालीचे चिंतेत सापडले आहेत. दरम्यान, वयोमर्यादेत शिथिलता असलेल्यांना त्या मर्यादेच्या काळातच पदभरती होईल की नाही, ही शंकाही उपस्थित होत आहे.- जिल्हा परिषदांत नोकरभरतीचे गाजरराज्यातील जिल्हा परिषदांमध्ये पदभरती करण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. राज्यभरातील परीक्षा शासन एकाच वेळी घेणार आहे. त्यामुळे सर्वच जिल्हा परिषदांनी जाहिराती ३ मार्च रोजी प्रसिद्ध केल्या तरी आॅनलाइन अर्ज प्रक्रिया २३ मार्च ते १६ एप्रिलदरम्यान होणार असल्याचे नमूद केले आहे. आॅनलाइन अर्ज प्रक्रियेला एवढा अवधी असताना जाहिराती प्रसिद्ध करण्यास हपापलेपणा शासनाकडून सुरू असल्याचे चित्र त्यातून स्पष्ट होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद