आंबोडा (जि. अकोला) : येथील ४२ वर्षीय महिलेने ३0 मे रोजीच्या पहाटे ६ वाजताच्या सुमारास आंबोडा गावठाणानजीक स्वत:च्या शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आंबोडा येथील ध्रुपता रामकृष्ण अस्वार (४२) या शेतकरी महिलेने स्वत:च्या शेतातील विहिरीत ३0 मे रोजी सकाळी ६ वाजतापूर्वी आत्महत्या केली. या घटनेबाबत विनोद जगन्नाथ अस्वार यांनी आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी आकोट ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी आकोट ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. या आत्महत्येचे कारण अद्यापही समजले नाही. पुढील तपास ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार के.टी. गोपनारायण, पोकाँ. आर. बी. कळस्कर करीत आहेत.
शेतकरी महिलेची आत्महत्या
By admin | Updated: June 1, 2015 02:19 IST