शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतसारा माफीची अंमलबजावणी कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 14:59 IST

शेतसारा माफ करण्यात आल्याचे अहवाल जिल्ह्यातील तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप सादर करण्यात आले नाही.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या ३ लाख ९ हजार ३४१ शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करण्याची कार्यवाही सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी गत महिन्यात जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिला; मात्र शेतकºयांचा शेतसारा माफ करण्यात आल्याचे अहवाल जिल्ह्यातील तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात शेतसारा माफीची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे वास्तव समोर येत आहे.अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील १०४ गावांमध्ये ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यामध्ये जिरायत, बागायत आणि फळ पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकºयांना मदत व सवलती देण्याचा निर्णय १८ नोव्हेंबर रोजी शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत घेण्यात आला. त्यानुसार पिकांच्या नुकसान भरपाईपोटी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी आठ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे.यासोबतच शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची सवलतही लागू करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची कार्यवाही सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिला. जिल्हाधिकाºयांनी आदेश देण्यास महिनाभराचा कालावधी होत असला तरी, शेतकºयांचा शेतसारा माफ करण्यात आल्याच्या कार्यवाहीचे अहवाल जिल्ह्यातील तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे वास्तव आहे.किती शेतकºयांचा; किती शेतसारा माफ?शासन निर्णयानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचा चालू आर्थिक वर्षाचा १३ लाख ९२ हजार रुपयांचा शेतसारा माफ होणार आहे; परंतु शेतसारा माफ करण्यात आल्याचे अहवाल जिल्ह्यातील सातही तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे किती शेतकºयांना किती शेतसारा माफ करण्यात आला, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची कार्यवाही करण्याचा आदेश गत महिन्यात जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात आला आहे; मात्र किती शेतकºयांना किती शेतसारा माफ करण्यात आला, यासंदर्भात अहवाल प्राप्त झाले नाहीत. याबाबतचे अहवाल तातडीने तहसीलदारांकडून मागविण्यात येतील.-संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी