शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

 शेतकऱ्यांचा देशी कपाशीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:58 IST

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेले ०८१ देशी कापूस बियाणे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेले ०८१ देशी कापूस बियाणे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत असून, शेतकºयांच्या मागणीनुसार कृषी विद्यापीठाने यावर्षी ४० क्ंिवटल बियाणे शेतकºयांना उपलब्ध करू न देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, देशी बीटीच्या यशस्वी संशोधनानंतर पुढच्या वर्षी याच कृषी विद्यापीठाच्या ०८१ सह एकेएच-५, एकेएच-७ या बियाण्यांमध्ये बीटी जीनचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. दरम्यान,यासाठी महाराष्ट्र बियाणे (महाबीज) महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक मंगळवारी नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या संचालक, शास्त्रज्ञांसोबत पार पडली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनीदेखील स्वत: विकसित केलेल्या ०८१ या वाणावर प्रयोग केले. बुटकी, १४० ते १४५ दिवसांत लवकर येणाºया या उथळ ते मध्यम जमिनीसाठी योग्य असून, या वाणाचे प्रात्यक्षिक घेतले, तेव्हा एकरी १० क्ंिवटल उत्पादन मिळाले आहे. यासाठी अतिघनता लागवड पद्धत वापरण्यात येऊन एकरी ४० हजार झाडे लावण्यात आली. या कापसावर रस शोषण कराणाºया किडींचा प्रादुर्भाव होत नसून, १४० दिवसांत हा कापूस काढला जात असल्याने कापूस काढलेल्या क्षेत्रावर दुबार पेरणी करता येते, हे विशेष. ०८१ रस शोषण करणाºया किडीला प्रतिबंधक आहे. ०८१ हे सरळ बियाणे एकदा घेतले, की ते तीन वर्षांपर्यंत स्वत:चे बियाणे तयार करू न वापरता येते. इतरांना देऊन क्षेत्र वाढविता येते. त्यामुळेच देशी कापूस पेरणीकडे शेतकºयांचा कल आहे. म्हणूनच यापर्षी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देशी कपाशीचे ४० क्ंिवटल बियाणे शेतकºयांना उपलब्ध करू न देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती डॉ. पंदेकृविच्या कापूस संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. डी. टी. देशमुख यांनी दिली.

यावर्षी देशी बीटी कापसाचे ५० हजार पॅकेट शेतकºयांना उपलब्ध करू न दिले जाणार आहेत. तद्वतच ०८१, एकेएच-५, एकेएच-७ या देशी कपाशीमध्ये बीटी जीन टाकण्यात येणार आहे. त्यासाठीचा लवकरच ‘सीआयसीआर’सोबत करारनामा केला जाणार आहे.सुरेश पुंडकर,महाव्यवस्थापक (उत्पादन),महाबीज, अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAkolaअकोला