शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात शेडे-नेट शेतीकडे शेतकऱ्यांचा कल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 16:46 IST

अकोला : ‘संरक्षित शेती’ संकल्पनेला विदर्भातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आता मोठ्या संख्येने येथील शेतकरी हरितगृह तंत्रज्ञानाकडे वळला आहे.

ठळक मुद्दे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आतापर्यत शेकडो शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले.शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाची पुरेपूर माहिती देण्यासाठी कृषी विभागासह कृषी विज्ञान कें द्राचा मोठा वाटा आहे. नियंत्रित वातावरणासाठी प्रामुख्याने पॉली हाऊससारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आता आवश्यक झाले आहे.

अकोला : ‘संरक्षित शेती’ संकल्पनेला विदर्भातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आता मोठ्या संख्येने येथील शेतकरी हरितगृह तंत्रज्ञानाकडे वळला आहे. शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाची पुरेपूर माहिती देण्यासाठी कृषी विभागासह कृषी विज्ञान कें द्राचा मोठा वाटा आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आतापर्यत शेकडो शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. येत्या वर्षात प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे.या तंत्रज्ञानामुळे तापमान, आर्द्र्रता व पाणी हे सर्व घटक कृत्रिमरीत्या नियंत्रित करू न पिकांच्या वाढीसाठी असलेले आवश्यक घटक पिकांच्या अवस्थेनुसार कमी अधिक प्रमाणात पुरविले जातात. या नियंत्रित वातावरणात सूर्यप्रकाश, कार्बनडॉय आॅक्साईड इत्यादी घटकांचा वनस्पतीच्या वाढीसाठी अधिक कार्यक्षमतेने वापर करू न मोकळ्या वातावरणापेक्षाही अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नियंत्रित वातावरणासाठी प्रामुख्याने पॉली हाऊससारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आता आवश्यक झाले आहे.पॉली हाऊसमुळे कमी जागेत व कमी कालावधीत जास्त उत्पन्न घेता येत असून, मजुरांना वर्षभर रोजगार उपलब्ध करू न देता येतो. विशेष म्हणजे गुंतवलेल्या रकमेतून खात्रीशीर उत्पन्न मिळते. गारपीट, अवकाळी पाऊस, वादळ वारा, दव, धुके, प्रखर तापमान या नैसर्गिक घटकांपासून पिकांचे नुकसान टाळले जाते. रोग किडींच्या प्रादुर्भावापासून पिकांचे संरक्षण करू न वेळेवर उपाययोजना करता येतात.या तंत्रज्ञानाचा वापर करू न उत्पन्नात दुप्पट ते चौपट वाढ होत असल्याने या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे अनुदान दिले जात आहे. शेतकºयांना हरितगृह बांधणी, लागवड व देखभाल या विषयासह हरितगृहाचे प्रकार व फायदे, अर्थशास्त्र, फूलशेती, भाजीपाला लागवड, तसेच हरित गृहातील पिकांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन आदीचे तंत्रज्ञान प्रशिक्षणाद्वारे समजावून सांगितले जात आहे. अकोला जिल्ह्यात शेडनेट ेशती वाढली असून, यावर्षींच्या उद्दीष्टानुसार आॅनलाइन अर्ज केलेल्या शेतकºयांना लॉटरी पध्दतीने शेड-नेट योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

या तंत्रज्ञानामुळे बिगरमोसमी उत्पादन घेता येत असून, पिकाला चांगले भाव मिळतात, संशोधन, दुर्मीळ वनस्पतीचे संगोपन तसेच बीजनिर्मिती व रोपनिर्मितीसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकºयांना हे तंत्रज्ञान प्रशिक्षणातून दिले जात आहे. आतापर्यंत शेकडो शेतकºयांना हे प्रशिक्षण दिले. - डॉ. दिलीप मानकर,संचालक,कृषी शिक्षण विस्तार,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ