मंगरुळपीर (जि. वाशिम): सततच्या नापिकीला कंटाळून तालुक्यातील सावरगाव कान्होबा येथील ५५ वर्षीय मधुकर मल्लुसिंग चव्हाण या शेतकर्याने त्यांच्या राहत्या घरातील चालू विद्युत वाहिनीस हात लावून आत्महत्या केली. ही घटना ९ मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक शेतकर्याने त्याच्या शेतात सकाळी जाऊन पिकाची पाहणी केली. निराश होऊन घरी परतले. त्यानंतर त्यांनी घरातील विद्युत वाहिनीस हात लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी र्मग दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहे.
नापिकीला कंटाळून शेतक-याची आत्महत्या
By admin | Updated: March 11, 2016 02:59 IST