हिवरखेड (जि. अकोला) : येथील एका शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२.३0 वाजता उघडकीस आली. हिवरखेड येथील इंदिरानगरामध्ये राहणारे रमेश शिवराम जऊळकार (वय ५५) यांनी शुक्रवार, १0 एप्रिल रोजी आपल्या स्वत:च्या मोहापाणी येथील शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांचा मृतदेह निंबाच्या झाडाखाली मृतावस्थेत मिळाल्याची तक्रार मृतकाची पत्नी कुसूम रमेश जऊळकारने हिवरखेड पोलिसात दिली. त्यावरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. मृतक रमेश जऊळकार यांच्याकडे १ हेक्टर शेती असून, त्यांच्या पश्चात एक मुलगा, पत्नी असा परिवार आहे.
हिवरखेड येथे शेतक-याची आत्महत्या
By admin | Updated: April 10, 2015 23:54 IST