शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी त्रस्त, नेते प्रचारात व्यस्त

By admin | Updated: October 6, 2014 01:44 IST

अकोला जिल्ह्यात तापमानाचा कहर आणि त्यात भारनियमनाचे संकट.

विवेक चांदूरकर / अकोलापरतीच्या पावसाने दिलेली दडी, ४0 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढलेले तापमान (ऑक्टोबर हिट), िपकांवर विविध किडींचा हल्ला, त्यातच भारनियमनाचा प्रकोप, यामुळे जिल्ह्यातील पिकांची अवस्था दयनीय झाली असून, कपाशी व सोयाबीन करपले आहे. शेतकरी चोहीकडून संकटात सापडला असतानाच नेते मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गुंग असून, अधिकार्‍यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. विदर्भात यावर्षी पावसाला दोन महिने विलंब झाल्याने खरीप पिकांची पेरणी दोन-अडीच महिने उशिराने झाली. त्यामुळे पिकांची दयनीय अवस्था असतानाच एक महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे िपके सुकत आहेत. जिल्ह्यात यावर्षी ४ लाख ४५ हजार ८६ हेक्टरवरच पेरणी झाली. सोयाबीनची २ लाख ३३ हजार १३३ हेक्टरवर तर कपाशी १ लाख १४ हजार ७0४ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. गत आठ दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान ३७ ते ४0 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. सध्या पिकांना पावसाची नितांत गरज आहे. आगामी तीन ते चार दिवसांत पाऊस झाला नाही तर जिल्ह्यातील संपूर्ण पिके करपणार असून, नुकसानाचे प्रमाण प्रचंड वाढणार आहे. पावसाच्या संकटासोबतच पिकांवर विविध किडींनीही आक्रमण केले आहे. यावर नियंत्रण मिळविण्याकरिता शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत आहेत. या संकटांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. दुसरीकडे सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. नेते, उमेदवार व कार्यकर्ते प्रचारात मग्न आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत शेतकर्‍यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.