शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांनी ४१ लाख क्विंटल कापूस विकला व्यापा-यांना!

By admin | Updated: December 7, 2015 02:49 IST

सीसीआय आणि पणणकडून चुका-यास विलंबाचा परिणाम.

अकोला : कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी यावर्षी खासगी बाजारात आतापर्यंत ४१ लाख २९ हजार क्विंटलपेक्षघ जास्त कापूस विकला असून, पणन महासंघाकडे १ लाख ७२ हजार ३८८, तर भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) २ लाख ९४ हजार ३३६ क्विंटल कापूस खरेदी केला आहे. आधारभूत किमतीपेक्षा १00 रुपये जास्त मिळत असल्याने शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांना कापूस विकला आहे. यावर्षी कापसाचे चुकारे बँके त थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होत असल्याने चुकार्‍यांना विलंब होऊन शेतकरी खासगी व्यापार्‍यांकडे वळला असल्याचे दिसून येते. सीसीआयने यावर्षी कापूस उत्पादक भागात ४८ कापूस खरेदी केंद्र सुरू केली असून, २ लाख ९४ हजार ३३६ क्विंटल कापूस खरेदी केला. पणन महासंघाने ७९ खरेदी केंद्रे सुरू केली. कापसाचे हमी दर प्रतिक्विंटल ४१00 रुपये असले तरी प्रतवारीचे निकष लावून खरेदी केली जात असल्याने शेतकर्‍यांना प्रत्यक्षात ३९00 ते ३९५0 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहेत. सीसीआय आणि पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रावर प्रतवारीचे निकष लावले जात असल्याचे बघून व्यापार्‍यांकडून थेट गावात जाऊन कापूस खरेदी केला जात आहे. यावर्षीचा दुष्काळ आणि खरीप पिकांचे झालेले नुकसान बघता कापसाचा उत्पादन खर्च निघावा, यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात कापसाला बोनस किंवा सामाजिक सुरक्षितता म्हणून दरवाढीची घोषणा होईल, यासाठी अनेक शेतकर्‍यांनी कापूस अद्याप विकलेला नाही. यासंदर्भात महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन.पी. हिराणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर्षी आतापर्यंत १ लाख ७२ हजार क्विंटल कापूस खरेदी केला असून, ५ डिसेंबरपर्यंतचे चुकारे बँकेत जमा केले असल्याचे सांगीतले. चुकारे मिळण्यास शेतकर्‍यांना सुरुवातीला अडचण वाटत असेल, पण ही योजना चांगली असल्याचे पुस्ती त्यांनी जोडली.