शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 16:30 IST

राजकीय पुढाºयांकडे वेळच उपलब्ध नसून, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीही निवडणुकीची तयारी करण्याच्या कामात गुंतले आहेत.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, राजकीय पक्ष आणि पुढारी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले असून, प्रशासकीय यंत्रणाही निवडणुकीच्या तयारीत गुंतली आहे. सतत सुरू असलेला पाऊस आणि पुरामुळे हाताशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे; परंतु निवडणुकीच्या धामधुमीत मात्र शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे डोळेझाक करण्यात येत आहे.निवडणूक आयोगामार्फत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम २१ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला असून, निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुषंगाने राज्यात सर्वच राजकीय पक्ष आणि पुढारी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकºयांना भेडसावणाºया विविध समस्या आणि प्रश्नांवर आवाज उठविणे आणि प्रश्नांचे निवारण करण्यासाठी आता राजकीय पुढाºयांकडे वेळच उपलब्ध नसून, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीही निवडणुकीची तयारी करण्याच्या कामात गुंतले आहेत.यावर्षीच्या पावसाळ्यात पाऊस सुरू होण्यास विलंब झाल्याने, मूग व उडीद पिकाचे उत्पादन बुडाले असून, गत दोन महिन्यांपासून सतत सुरू असलेला पाऊस आणि पुरामुळे कपाशी, सोयाबीन, तूर व इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. पीक नुकसानासह विविध समस्या आणि प्रश्नांचा शेतकºयांना सामना करावा लागत असताना, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शेतकºयांच्या प्रश्नांकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.शेतकºयांच्या अशा आहेत समस्या आणि प्रश्न! पाऊस आणि पुरामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले; मात्र पीक नुकसानाचे सर्व्हे प्रलंबित असून, मदतीचा निर्णय अद्याप झाला नाही. हमी दराने मूग, उडिदाची खरेदी अद्याप सुरू करण्यात आली नसल्याने शेतकºयांना कमी दरात शेतमाल विकावा लागत आहे. बहुतांश शेतकरी पीक कर्जाच्या लाभापासून अद्याप वंचित आहेत. कर्जमाफीसाठी पात्र सर्व शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.

राजकीय पुढारी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले असून, प्रशासन निवडणूक तयारीच्या कामात गुंतले आहे. पाऊस आणि पुरामुळे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे; परंतु निवडणुकीच्या धामधुमीत शेतकºयांना भेडसावणाºया विविध प्रश्नांकडे कानाडोळा होत आहे.- मनोज तायडेशेतकरी जागर मंच, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019