शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांनी केली रब्बीची तयारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:39 IST

अकोला : विदर्भातील शेतकर्‍यांनी रब्बी हंगामासाठीच्या पेरण्याची तयारी केली असून, दमदार परतीच्या पावसाची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे. यावर्षी सरासरी पावसाचे प्रमाण घटले आहे. परतीचा पाऊस जर आला नाही, तर मात्र रब्बी हंगामातील अध्र्या अधिक क्षेत्रावरील पेरा घटण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआता परतीच्या पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भातील शेतकर्‍यांनी रब्बी हंगामासाठीच्या पेरण्याची तयारी केली असून, दमदार परतीच्या पावसाची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे. यावर्षी सरासरी पावसाचे प्रमाण घटले आहे. परतीचा पाऊस जर आला नाही, तर मात्र रब्बी हंगामातील अध्र्या अधिक क्षेत्रावरील पेरा घटण्याची शक्यता आहे. गतवर्षी पश्‍चिम विदर्भात अतवृष्टी झाली. परतीच्या पावसानेही चांगलाच मुक्काम ठोकल्याने त्याचा फायदा रब्बी हंगामाला झाला होता. त्यामुळे पश्‍चिम विदर्भात गतवर्षी साडेआठ लाखांपेक्षा अधिक हेक्टरवर रब्बीची पेरणी शेतकर्‍यांनी केली होती. पावसाचा ओलावा अधिक असल्याने रब्बी पिके चांगली होती; परंतु काढणीच्या वेळी या पावसाने शेतकर्‍यांना दगा दिलाच होता.रब्बी पिकांसाठी ओलाव्याची गरज असते. पण, यावर्षी संपूर्ण पावसाळ्य़ात सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नसल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला. शेतकर्‍यांनी मात्र पेरणीची तयारी पूर्ण केली आहे. परतीचा पाऊस न आल्यास मात्र रब्बी पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. पश्‍चिम विदर्भातील शेतकरी रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा, तर पूर्व विदर्भात जवस या पिकाची पेरणी करतात. करडी, मोहरी व गहू या पिकांचा पेराही केला जातो. गहू पिकाला अलीकडे पाण्याची गरज असल्याने संरक्षित सिंचनाची ज्यांच्याकडे सोय आहे, ते शेतकरी गहू पेरणी करतात. तथापि, यावर्षी पश्‍चिम विदर्भातील काही धरणांमध्ये अल्प जलसाठा उपलब्ध आहे. नदी-नाले, शेततळ्य़ात पाणीच नसल्याने गहू पिकाचे क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

 परतीच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकर्‍यांनी २५ ऑक्टोबरपर्यंत हरभर्‍याची पेरणी शक्यतो टाळावी, हरभर्‍याला कमी पाऊस लागतो, पेरणीनंतर जोरदार पाऊस आल्यास दुबार पेरणीची वेळ येते. ३0 ऑक्टोबरपर्यंत हरभर्‍याची पेरणी करता येईल.डॉ. मोहनराव खाकरे,कृषी विद्यावेत्ता,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

टॅग्स :Farmerशेतकरी