शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शेतकऱ्यांचा उद्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2017 00:41 IST

अकोला: विविध मागण्यासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. अनेक ठिकाणी रास्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला: विविध मागण्यासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. अनेक ठिकाणी रास्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात आला.तेल्हारा: येत्या खरीप हंगामापूर्वी शासनाने शेतकऱ्यांच्या सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी, याकरिता राज्यभर शेतकऱ्यांकडून संप सुरू असून, ५ जून रोजी तेल्हारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा जाहीर केला तर विविध संघटनांनीसुद्धा या बंदमध्ये सहभागी होऊन आपला पाठिंबा दिला. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या वतीने बंदचे आवाहन ५ जून रोजी करण्यात आले होते. या बंदला तेल्हाऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तेल्हारा तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांना देण्यात आले. या निवेदनावर सूरज खारोडे, गजानन माझोडकर, विवेक खारोडे, अनंत विखे, नीलेश चव्हाण, रवी राऊत, प्रमोद गावंडे, चंद्रकांत मोरे, वैभव खाडे, ललीत पारसकर, दीपक अहेरकर, विठ्ठल खाडे, निखिल खाडे, सचिन सपकाळ, पुरुषोत्तम तायडे, मुक्ता पारसकर, अमोल गडम, हरीश पाथ्रीकर, जयंत अहीर आदींची स्वाक्षरी आहे. डॉक्टर, मेडिकल असोसिएशनचा पाठिंबा शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संप व तेल्हारा बंदला डॉक्टर आणि मेडिकल असोसिएशनचा पाठिंबा देऊन शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करणारे निवेदन तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांना दिले. निवेदनावर डॉ. अशोक बिहाडे, डॉ. आर. आर. राठी, डॉ. संजीवनी बिहाडे, डॉ. अनिल मल, डॉ. गीता मल, डॉ. ज्ञानेश्वर तराळे, डॉ. अनुप चौधरी, डॉ. मधुकर मुनेश्वर, डॉ. के. एन. घले, डॉ. डी. एन. राठी, डॉ. एस. बी. राऊत, डॉ. बी. टी. जायले, डॉ. राहुल सदाफळे, डॉ. अंजली सदाफळे, डॉ. विश्वास नेमाडे, डॉ. दीपक राऊत यांच्यासह मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांची स्वाक्षरी आहे.शेतकऱ्यांनी फेकला भाजीपाला बंददरम्यान शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थानिक महाराजा अग्रसेन टॉवर चौकात कांदा, भाजीपाला रस्त्यावर फेकून शासनाचा निषेध करीत शासनविरोधी घोषणा दिल्या. यावेळी तालुक्यातील गावागावतून शेतकरी जमले होते.शेतकरी जागर मंचचा सहभागी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या तेल्हारा बंदमध्ये शेतकरी जागर मंचचे गजानन वारकरी, चंद्रकांत मोरे, रामा वासनकार हे सहभागी झाले होते. स्थानिक टॉवर चौकात घोषणा देऊन कार्यकर्त्यांसह तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.