हिवरखेड (जि. अकोला) : पूर्ववैमनस्त्यातून शेतकर्याचा खून झाल्याची घटना हिवरखेडजवळ असलेल्या मोराडी खंडाळा शेतरस्त्यावर मंगळवारी सकाळी घडली. सतीश ऊर्फ संतोष भीमराव ढबाले (वय ३५) हे या शेतकर्याचे नाव आहे. सतीश ढबाले हे २५ जानेवारी रोजी रात्री घरून त्यांच्या मोराडी शिवारातील शेतामध्ये राखन करण्यासाठी गेले. २६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ते एमएच ३0 एए ३२६ या क्रमांकाच्या दुचाकीवर जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती तेथून जाणारे विनोद कानतोडे यांनी मृतकाचा भाऊ गजानन यांना दिली. त्यानंतर गजानन यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच आकोट उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे, तेल्हारा ठाणेदार अन्वर शेख, हिवरखेड ठाणेदार सुधाकर देशमुख यांच्यासह पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी गजानन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविचे कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला.संशयित मोहन किसन लांडगे याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार सुधाकर देशमुख, पीएसआय हेमंत चौधरी करीत आहेत. पोलिसांनी श्वान पथकालाही पाचारण केले होते.
शेतक-याचा खून
By admin | Updated: January 28, 2016 00:45 IST