शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा काढण्यासाठी शेतक-यांचा अत्यल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:15 IST

अकोला : पीक विमा सर्वच शेतकºयांना काढता यावा, यासाठी रविवारी बँका सुरू ठेवण्यात आल्या; मात्र जिल्ह्यात अकोट, पातूर, बाळापूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा आदी तालुक्यांमध्ये शेतकºयांचा विमा काढण्यासाठी अल्प प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी शेतकरी फिरकलेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पीक विमा सर्वच शेतकºयांना काढता यावा, यासाठी रविवारी बँका सुरू ठेवण्यात आल्या; मात्र जिल्ह्यात अकोट, पातूर, बाळापूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा आदी तालुक्यांमध्ये शेतकºयांचा विमा काढण्यासाठी अल्प प्रतिसाद मिळाला.रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या निर्देशानुसार, आज पीक विमा काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या. पातुरात दुपारी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत दुपारपर्यंत केवळ नऊ, ४.३० वाजता युनियन बँक आॅफ इंडियाच्या पातूर शाखेतून ८०, तर अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पातूर शाखेतून सायंकाळपर्यंत ४०३ शेतकºयांनी पीक विमा काढला होता. पातूर तालुक्यात ४० हजार ९६८ शेतकरी आहेत.यापैकी दोन हजारांपेक्षा कमी शेतकºयांनी विमा काढल्याचे चित्र आहे. यावर्षी कर्जाचे पुनर्गठन, कर्जमाफी आणि नवीन कर्ज वितरण प्रक्रिया अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाही. यावर्षी पीक परिस्थिती पाण्याच्या अनियमिततेमुळे अतिशय धोकादायक आहे. तहसीलदार डॉ. आर. जी. पुरी, तालुका कृषी अधिकारी एस. एम. मकासरे, गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी सर्व ठिकाणी भेटी दिल्या असता कुठेही शेतकºयांनी पीक विम्यासाठी गर्दी केल्याची माहिती नाही, असे सांगितले.पीक विमा योजनेस मुदतवाढ द्या!- पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी सोमवार, ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. पीक विमा आॅनलाइन भरण्याच्या पद्धतीमुळे बँका व सेतूसमोर मोठ्या रांगा लागत आहेत. त्यामुळे अद्यापही सर्वच शेतकरी पीक विमा काढू शकले नाहीत. त्यामुळे पीक विमा काढण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी बाळापूरचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी शासनाकडे केली आहे.- खारपाणपट्ट्यात शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. सिंचनाची सुविधा नाही आणि सिंचन प्रकल्पाची कामे ठप्प पडली आहेत. कधी पाऊस न आल्याने तर कधी अतिवृष्टी झाल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात हानी होते. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेतो. अशा वेळी पीक विमा काढल्यास नुकसान भरपाई मिळू शकते. म्हणून शेतकरी पीक विमा योजनेचे प्रस्ताव भरण्यासाठी बँकेत येत आहेत; मात्र काही ठिकाणी पीक विमा प्रस्ताव स्वीकारण्यास बँक मनाई करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.- अनेक बँकेत ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध नाही. ज्या ठिकाणी ब्रॉडबँड सुविधा नाही, त्या बँकांनी आॅफलाइन पद्धतीने विमा प्रस्ताव स्वीकारावे तसेच पीक विमा योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी केली आहे.