शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नदी-नाले कोरडे: फवारणीसाठी शेतकऱ्यांना घरूनच न्यावे लागतेय पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 14:03 IST

जिल्ह्यातील बहुतांश गावांत पिकांवरील कीटकनाशकांच्या फवारणीसाठी शेतकऱ्यांना घरूनच पाणी न्यावे लागत आहे.

- संतोष येलकरअकोला : पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून जात असला तरी, जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पावसाअभावी नदी-नाले कोरडे असून, शेततळ्यांमध्येही पाणी साचले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावांत पिकांवरील कीटकनाशकांच्या फवारणीसाठी शेतकऱ्यांना घरूनच पाणी न्यावे लागत आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून जात आहे; मात्र जिल्ह्यात अद्यापही सार्वत्रिक जोरदार पाऊस झाला नाही. जिल्ह्यातील बहुतांश भागात नदी-नाले कोरडे असून, विहिरींच्या पाणी पातळीने तळ गाठला असून, शेतातील पाटांमध्ये आणि शेततळ्यांमध्ये पाणी साचले नाही. शेतात पाणी उपलब्ध नसल्याने, जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर, बाळापूर या पाच तालुक्यांमधील बहुतांश गावांमध्ये शेती पिकांवरील कीटकनाशकांच्या फवारणीसाठी शेतकºयांना घरूनच पाणी न्यावे लागत आहे. बोअर, हातपंप व विहिरींचे पाणी ट्रॅक्टर, बैलगाडी, दुचाकीद्वारे शेतकºयांना फवारणीसाठी शेतात न्यावे लागत आहे. त्यानुषंगाने पावसाळ्यातच जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पिकांच्या फवारणीसाठी शेतकºयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.पाणी विकत घेऊन करावी लागते फवारणी!फवारणीसाठी शेतात पाणी उपलब्ध नसल्याने बाळापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकºयांना पिकांच्या फवारणीसाठी खासगी बोअरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. १५० रुपये प्रतिट्रॉलीप्रमाणे पाणी विकत घेऊन शेतकºयांना फवारणी करावी लागत आहे.सरासरी ५१२.४ मिमी पाऊस; पण शेतात नाही पाणी!जिल्ह्यात १ जून ते २३ आॅगस्टपर्यंत सरासरी ५१२.४ मिमी पाऊस पडला आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यात ४६६.६ मिमी, बार्शीटाकळी-५६५ मिमी, अकोट- ५९५.६ मिमी, तेल्हारा- ५३८.५ मिमी, बाळापूर- ४९७.५ मिमी, पातूर- ५०३.४ मिमी व मूर्तिजापूर तालुक्यात ४२०.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात सरासरी ५१२.४ मिमी पाऊस पडला असला तरी, बहुतांश गावांमध्ये शेततळे, नाले आणि पाटात पाणी उपलब्ध नसल्याने, फवारणीसाठी शेतकºयांना घरून पाणी न्यावे लागत आहे.दमदार पाऊस पडला नसल्याने, शेतातील पाटात आणि शेततळ्यांमध्ये पाणी साचले नाही. त्यामुळे पिकांच्या फवारणीसाठी शेतकºयांना गावातील बोअरचे पाणी ट्रॅक्टर, बैलगाडीद्वारे शेतात न्यावे लागत आहे.-शिवाजीराव भरणे,शेतकरी, रामगाव, ता. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी