शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला थेट विक्रीतून शेतक-यांना मिळाला दुप्पट भाव!

By admin | Updated: January 20, 2017 02:44 IST

रणधीर सावरकर यांचा पुढाकार; ताजा भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

अकोला, दि. १९- शहरातील जठारपेठमधील किरकोळ भाजीपाला विक्रेते आणि शेतकर्‍यांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी घेतलेला पुढाकार यशस्वी झाला. त्यामुळे गुरुवारी भाजीपाला थेट विक्रीतून भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांना बाजार भावापेक्षा दुप्पट भाव मिळाला असून, ताजा आणि स्वस्त दरात मिळणारा भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांनीही गर्दी केली. अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत महानगरपालिकेमार्फत शहरातील जनता भाजी बाजारमधील अतिक्रमित दुकाने पाडण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या निषेधार्थ जनता भाजी बाजारातील व्यापारी आणि दलालांनी तीन दिवसांपूर्वी भाजी बाजार बंद ठेवला. या बंदमध्ये किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी सहभाग घेतला नाही म्हणून त्यांना भाजीपाला देणे बंद करण्यात आले. किरकोळ विक्रेत्यांनी दलालांच्या या निर्णयाविरोधात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच दलालांच्या या निर्णयामुळे भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जठारपेठ भाजी विक्रेता संघाच्या पदाधिकार्‍यांनी आमदार रणधीर सावरकर यांची भेट घेतली. किरकोळ भाजी विक्रेत्यांच्या अडचणी आ. सावरकर यांनी समजून घेतल्या आणि शेतकर्‍यांचा शेतमाल थेट त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याबाबतचे नियोजन केले. त्यानुसार गुरुवारी पुनोती येथील मनोहर मानकर आणि शंकर सराळे या दोन शेतकर्‍यांनी आणलेली भाजीपाल्याची गाडी थेट जठारपेठमधील भाजी बाजारात पोहोचविण्यात आली. तेथील भाजी विक्रेता संघाच्या पदाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांनी आणलेला भाजीपाला दलाल आणि व्यापार्‍यांपेक्षा दुप्पट दराने विकत घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोचविला. थेट भाजीपाला विक्रीतून भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांना दुप्पट भाव मिळाला. ग्राहकांनाही नेहमीपेक्षा माफक दरात ताजा भाजीपाला उपलब्ध झाला. त्यामुळे थेट आणि ताजा मिळणारा भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे चित्र होते.