शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

दीड लाखांवर शेतकर्‍यांनी भरले कर्जमाफीचे अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:46 IST

कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये सोमवार,  ११ सप्टेंबरपर्यंत १ लाख ५२ हजार ५७६ शेतकर्‍यांचे  कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. 

ठळक मुद्देकर्जमाफी अर्जाच्या नादात महिलेचा अपघातशेतकर्‍यांना वेठीस धरणे बंद करा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये सोमवार,  ११ सप्टेंबरपर्यंत १ लाख ५२ हजार ५७६ शेतकर्‍यांचे  कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र,  सामूहिक सेवा केंद्र (सीएससी ) आणि आपले सरकार केंद्र  इत्यादी सेतू केंद्रांवर थकबाकीदार शेतकर्‍यांचे ऑनलाइन  अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची  मुदत १५ सप्टेंबरपर्यंत आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीचे  ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांचे सेतू केंद्रांवर गर्दी  होत आहे. दरम्यान, ११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात  कर्जमाफीसाठी १ लाख ८३ हजार ३0९ शेतकर्‍यांच्या  अर्जांची नोंदणी करण्यात आली असून, १ लाख ५२ हजार  ५७६ शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. दरम्यान,  ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक नसलेल्या  आणि बायोमेट्रिक मशीनवर अंगठा (थम) जुळत नसलेल्या  शेतकर्‍यांच्या आधार क्रमांक नोंदणीसाठी जिल्ह्यात २२  केंद्रांवर नोंदणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

कर्जमाफी अर्जाच्या नादात महिलेचा अपघातकर्जमाफी अर्जासोबत आधारचे विवरण जुळत नसल्याने  देगाव मानकी येथील शेतकरी महिला वाडेगाव येथे जाताना  झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. खासगी  रुग्णालयात तिच्यावर उपचारासाठी आता पैशाचीही  अडचण निर्माण झाली. त्यामुळे शासनाने छत्रपती शिवाजी  महाराज शेतकरी सन्मान योजना नावाने सुरू केलेली  कर्जमाफी योजना प्रत्यक्षात शेतकर्‍यांचा अवमान करणारी  ठरत असून, त्यासाठी शेतकर्‍यांना वेठीस धरण्याचे प्रकार  बंद करा, अशी मागणी भारिप-बमसंचे जिल्हा उपाध्यक्ष गौ तम सिरसाट, ज्ञानेश्‍वर सुलताने यांनी निवेदनात केली आहे. मानकी येथील महिला सुधाबाई कैलास सिरसाट ही महिला  कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी बाळापूर येथे गेली.  तेथे आधार कार्डातील माहितीचे विवरण जुळत नव्हते.  त्यामुळे महिलेला वाडेगाव येथील आधार अद्ययावतीकरण  केंद्रात जाण्याचा सल्ला केंद्र संचालकाने दिला. त्यानुसार वाडेगावकडे जाताना खड्डय़ात वाहन उसळल्याने  अपघात झाला. त्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. उ पचारासाठी अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल  करावे लागले. आता उपचारासाठी प्रचंड खर्च होत आहे. या  प्रकारातून शेतकर्‍यांना वेठीस धरले जात आहे. ते त्वरित बंद  करावे, अशी मागणीही सिरसाट, सुलताने यांनी केली आहे.