शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संकटात; विनाअट हवी मदत - किशोर तिवारी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 12:50 IST

शासनाने कोणतीही अट न लावता विनाअट पीक नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे, अशी मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.

- संतोष येलकर

अकोला: सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यात २० लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी व भात पिकाचे नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविल्याने, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने कोणतीही अट न लावता विनाअट पीक नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे, अशी मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.पावसाळा संपल्यानंतर गत २० आॅक्टोबरपासून परतीचा पाऊस सतत बरसत आहे. सतत बरसणाºया परतीच्या पावसाने, कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन, ज्वारी, भात या पिकांसह कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे भिजलेले सोयाबीन व ज्वारीचे पीक सडले असून, कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्याने या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांत आणि मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांत अशा एकूण २५ जिल्ह्यांत २० लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने, हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने कोणतीही अट न लावता विनाअट पीक नुकसान भरपाईची मदत दिली पाहिजे, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.पीक नुकसानाचे अर्ज सादर करण्यासाठी शेतकºयांची धावपळ!पीक विमा काढलेल्या शेतकºयांनी पीक नुकसानाची माहिती संबंधित पीक विमा कंपनीकडे देणे आवश्यक आहे; मात्र तालुकास्तरावर विमा कंपनीचे अधिकारीच उपलब्ध नाहीत, त्यामुळे पीक नुकसानाच्या माहितीचे अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयांमध्ये सादर करण्यासाठी शेतकºयांना धावपळ करावी लागत आहे. पीक नुकसानाच्या माहितीचे अर्ज सादर करण्याची मुदत शासनाने वाढवून दिली पाहिजे, अशी मागणीही किशोर तिवारी यांनी केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKishor Tiwariकिशोर तिवारी