शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:30 IST

कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबरची मुदत संपण्यास एक दिवसांचा कालावधी उरला असतानाच, कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शासनामार्फत गुरुवारी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुषंगाने कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर शेतकर्‍यांची गर्दी होत असून, सकाळपासूनच सेतू केंद्रांवर शेतकर्‍यांच्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देएक दिवसांचा कालावधी उरला असतानाच  सात दिवसांची मुदतवाढ सकाळपासूनच सेतू केंद्रांवर शेतकर्‍यांच्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबरची मुदत संपण्यास एक दिवसांचा कालावधी उरला असतानाच, कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शासनामार्फत गुरुवारी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुषंगाने कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर शेतकर्‍यांची गर्दी होत असून, सकाळपासूनच सेतू केंद्रांवर शेतकर्‍यांच्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे.कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शासनामार्फत यापूर्वी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुषंगाने  कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी केवळ एक  दिवसांचा कालावधी उरला असल्याने, अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर गुरुवारी शेतकर्‍यांची गर्दी झाली होती. सकाळपासूनच सेतू केंद्रांवर कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांच्या रांगा लागत असतानाच, कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शासनामार्फत सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार शेतकर्‍यांना कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज २२ सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहेत. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली असली, तरी अर्ज भरण्यासाठी मात्र शेतकर्‍यांची धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सेतू केंद्रांवर कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरताना बायोमेट्रिक मशीनवर अनेक शेतकर्‍यांचा ‘अंगठा’ आधार क्रमांकाशी संलग्नित होत नसल्याने, संबंधित शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यात येत नाहीत. आधार क्रमांकाशी अंगठा संलग्नित होत नसल्याचा वांधा कायम असल्याने, धावपळ करूनही कर्जमाफीचा ऑनलाइन अर्ज भरणार कसा, या समस्येने अनेक शेतकरी हैराण झाले आहेत.