शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शेतकरी कंपन्यांची दोनशे कोटींची उलाढाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 12:14 IST

अकोला : बाजाराभिमुख व्यवस्थापनासाठी शेतकरी गटाच्या राज्यात दोन हजारांवर कंपन्या स्थापन करण्यात आल्या असून, यातील १८४ कंपन्यांनी आजमितीस २०४ कोटींची उलाढाल केली आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला : बाजाराभिमुख व्यवस्थापनासाठी शेतकरी गटाच्या राज्यात दोन हजारांवर कंपन्या स्थापन करण्यात आल्या असून, यातील १८४ कंपन्यांनी आजमितीस २०४ कोटींची उलाढाल केली आहे. काही कंपन्यांनी शेतमालाची थेट परदेशात निर्यात सुरू केली आहे. यात विदर्भातील अकोला जिल्ह्यातील शेतकरी कंपनीचा समावेश आहे; पण शेतकरी गटांना प्रोत्साहन देणारा प्रकल्पच बंद करण्यात आला आहे.शेतकऱ्यांनी बाजाराभिमुख पिके घ्यावीत, यासाठीचे नियोजन जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाद्वारे करण्यात आले होते. शेतकरी गटाच्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पणन मंडळ, आत्मा व खासगी कंपन्यांनी काम केले. शेतकरी कंपन्यांना प्रोत्साहन व भांडवलाची गरज पूर्ण व्हावी, याकरिता राज्याच्या कृषी विभागाने पुढाकार घेतला; पण ज्या उद्देशासाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प सुरू करण्यात आला होता, तो प्रकल्पच बंद पडला आहे. नोव्हेंबर २०१८ पर्यंत या प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात आली होती. आता दोन महिन्यांपासून प्रकल्प ठप्प आहे. याच प्रकल्पांतर्गत शेतकरी कंपन्यांनी २०४ कोटींची उलाढाल केली आहे. असे असले तरी बºयाच कंपन्या मागे पडल्या आहेत. जागतिक बँकेच्या प्रकल्पासह शासनाने शेतकरी कंपन्यांना कृषी विभागातून योजना दिल्या. आता शेतकरी कंपन्यांच्या भागधारकांनी शेतकरी विकासाच्या दृष्टीने पुढे येणे गरजेचे आहे. शासनानेही कायमस्वरू पी एक अधिकारी तालुका, जिल्हा स्तरावर देण्याची गरज आहे. पणन मंडळाने जेवढ्या संचालकांना निर्यातीचे विनामूल्य प्रशिक्षण दिले. त्यांनीदेखील निर्यातीचे काम सुरू करण्याची गरज आहे.- अकोल्याच्या ‘नरनाळा’ची निर्यात!राज्यात नाशिक येथील अ‍ॅग्रो शेतकरी कंपनी आशिया खंडातील पहिल्या पाचमध्ये द्राक्ष निर्यात करणारी कंपनी असून, महाएफपीसी कंपनी कांदा विक्रीत अग्रेसर आहे. ही कंपनी केरळ, चेन्नई येथे कांदा पाठवित आहे. अकोला-अकोट येथील नरनाळा कंपनीने केळी व डाळिंब निर्यातीत पाऊल टाकले आहे. दरम्यान, खासगी, सार्वजनिक भागेदारीचा २५ कोटींचा प्रकल्प यासाठी मंजूर करण्यात आला आहे. कंपन्यांनी आता अनुदानावर अवलंबून न राहता खासगी कंपन्यांप्रमाणे काम करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

- राज्यात दोन हजारांवर शेतकरी कंपन्यांचे जाळे विणण्यात आले असून, १८४ कंपन्यांची २०० कोटींच्यावर उलाढाल सुरू आहे. निर्यातही सुरू आहे. आता भागधारकांनी ताकदीनिशी पुढे येणे गरजेचे आहे.प्रशांत चासकर,कृषी पणन तज्ज्ञ, पुणे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी