शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कृषिमंत्र्यांनी खरेदी केला शेतमाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2017 02:15 IST

कृषी प्रदर्शनाला शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोला, दि. २८- शेतकर्‍यांनी कृषी प्रदर्शनात आणलेला दज्रेदार शेतमाल बघून राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनाही मोह आवरला नाही. त्यांनी हा शेतमाल खरेदी केला. यामागे शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्याचा त्यांचा उद्देश होता. कृषिमंत्र्यांनी शेतकर्‍यांची यावेळी विचारपूस केली.अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार एकर जागेवर राज्यस्तरीय वसंत कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचा शनिवारी दुसरा दिवस होता. या प्रदर्शनाला राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि खासदार संजय धोत्रे यांनी भेट दिली. याप्रसंगी बाजार समितीचे मार्गदर्शक माजी मंत्री वसंतराव धोत्रे व बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नीळकंठ खेडकर, संचालक प्रकाशकाळे, राजेश बेले, बाबूराव गावंडे, ज्ञानेश्‍वर महल्ले, विठ्ठलराव चतरकर, देवेंद्र देवर, अभिमन्यू वक्टे, सुनील परनाटे, प्रमोद लाखे, संदीप पळसपगार, चंद्रशेखर खेडकर, रमेशचंद्र चांडक, चंदू चौधरी, सुरेश सोळंके, अभय थोरात, जयंत मसने, रविकांत राऊत, डिगांबर गावंडे, विद्या गावंडे, मंदाकिनी फुंडकर, अर्चना मुरू मकार, वर्षा गावंडे, प्रतिभा अवचार आदींसह उद्योजक बसंत बाछुका, बाजार समितीचे सचिव सुनील मालोकार आदींची उपस्थिती होती.कृषिमंत्र्यांनी कृषी प्रदर्शनातील बहुतांश दालनाला भेट दिली. शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतात तयार केलेली काकडी, सिसा-मासा येथे शेतकरी फाले यांनी शेतात काढलेला भुईमूग आदीसह कॅशलेस व्यवहार शेतकर्‍यांना समजावून सांगणार्‍या दालनालाही त्यांनी भेट दिली. ग्रीन आर्मी सेंटर, विजय शेगोकार यांची हळद व इतर अवजारे, बचत गटाने प्रक्रिया करू न केलेला शेतमाल त्यांनी बघितला. बचत गट, शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी कृषिमंत्र्यांनी त्यांचा शेतमाल विकत घेतला. याप्रसंगी शेतकर्‍यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले, त्यांनी त्यांचे उत्तर देऊन समाधान केले.शेतकर्‍यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी यांनी शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती व कृषी विद्या या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच शेतकर्‍यांच्या शंकांचे निरसन केले. इतर खासगी कंपन्यांच्या संचालकांनी शेतकर्‍यांना मार्गर्शन केले.